पुणे – गुडघेदुखीची सुरुवात तेव्हा होते जेव्हा गुडघे कमी तीव्रतेने पण सातत्याने दुखण्यास सुरुवात होतात. काही जणांना गुडघेदुखीसोबत सूजही जाणवू शकते. दुखण्याची तीव्रता जसजशी वाढत जाते त्यानुसार सांधे आखडण्यास सुरुवात होते आणि सूजही जाणवते. गुडघेदुखीची तीव्रता वाढतते आणि त्याची लक्षणेही प्रकर्षाने जाणवू लागतात. त्यावेळी आपल्याला लक्षात येते की गुडघेदुखी समस्या बळावत चाललीय. आता यावर उपचार करणे गरजेचे आहे.
गुडघेदुखीच्या कारणांचा विचार केला तर हा आजार सामान्यतः वयोमानानुसार होणार आजार आहे. त्याची अशी विशिष्ट करणे नाहीत. जसजसे आपले वय वाढते त्यानुसार हा आजार वाढत जातो. साधारण 55 ते 60 या वयात गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा यामुळे तुमच्या गुडघ्यावर ताण पडू शकतो. त्याचबरोबर गुडघ्यांच्या इन्जुरीस आणि फ्रॅक्चर, गुडघ्यात असणारा वाक यामुळे गुडघ्याच्या घर्षणाचे प्रमाण अधिक होते आणि त्रास कमी वयातही जाणवू शकते.
गुडघेदुखीचा त्रास सुरु झाल्यास डॉक्टरांशी कधी संपर्क साधला पाहिजे ?
सुरुवातीला जेव्हा आपल्याला गुडघेदुखीचा त्रास सुरु होतो तेव्हा आपण प्राथमिक उपचार घेतो किंवा वेदनाशामक गोळ्या घेतो, फिझियो थेरपी करतो. परंतू जेव्हा गुडघेदुखीचा त्रास सलग सुरुच राहतो जसेकी दोन ते तीन महिने आणि हा त्रास वाढत जातो आणि तुमच्या दैनंदिन जीवनात उठणं, बसणं कठीण होतं. त्यावेळी आपण ऑर्थोपेडिक डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आणि आजाराच्या तीव्रतेनुसार त्यावर डॉक्टरांकडून उपचार घेतले पाहिजे.
गुडघेदुखी होऊ नये यासाठी वैयक्तिक काय काळजी घ्यावी ?
गुडघेदुखी हा वयोमानानुसार होणार आजार आहे. पण हा आजार होऊ नये यासाठी आपण वैयक्तिक काळजी घेणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दैनंदिन जीवनात व्यायामाचा महत्वाचा भाग असला पाहिजे. त्याचबरोबर गुडघ्यावर ताण न आणता स्विमिंग आणि सायकलिंग यासारखे व्यायाम केले पाहिजे. सांध्यांवर अतिदाब येणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. तसेच योग्य आहार घ्यावा. सर्व प्रकारच्या भाज्यांचा समावेश आपल्या आहारात असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस् आणि व्हिटॅमिन डी यांच्या कमतरतेमुळे गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आहारात या घटकांचे प्रमाण वाढवावे.
गुडघेदुखीच्या तीव्रतेनुसार, स्वरूपानुसार कोणकोणते उपचार केले जातात ? विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती या विषयावर अधिक माहिती –
गुडघेदुखी आणि त्यावरील उपचारांना आपण तीन भागांमध्ये विभाजित करतो. पहिला जो टप्पा असतो त्याला सौम्य गुडघेदुखी, दुसऱ्या टप्प्याला मध्य स्वरूपाची आणि तिसऱ्या टप्प्याला एक्स्ट्रीम किंवा लेट स्वरूपाची गुडघेदुखी म्हणतो. शेवटच्या टप्प्यात गुडघ्याच्या हाडांची झीज अधिक प्रमाणात होते आणि त्यावेळी शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय आपल्याला निवडावा लागतो. त्यामुळे वेळीच गुडघेदुखीचे स्वरूप लक्षात घेऊन डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. पहिल्या टप्प्यात प्राथमिक उपचार केले जातात. दुसऱ्या टप्प्यामध्ये विनाशस्त्रक्रिया उपचार पद्धती केली जाते. विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीमध्ये अजून तीन विशेष गोष्टींकडे लक्ष दिले जाते. ते म्हणजे गुडघ्याची सूज किंवा दुखणं, गुडघ्याची झीज थांबवणे आणि गुडघ्याचे फ्रिक्शन थांबवणे.
‘प्रोलोथेरपी’ या उपचार पद्धती –
‘प्रोलोथेरपी’ नैसर्गिकरित्या त्रास होणाऱ्या भागावर काम करते. त्या विशिष्ट भागात रक्तपुरवठा वाढवते. गुडघ्यातील भागाची जैविकता वाढवण्यासाठी ‘पीआरपी’ नावाची उपचारपद्धती केली जाते. ज्यात प्लेटलेट सेलच्या मदतीने गुडघ्याच्या भागात रक्तपुरवठा वाढवला जातो. त्याचबरोबर आर्टिफिशिअल ऑइलचा वापर करून गुडघ्यांचे होणारे घर्षण थांबवता येते. अशा प्रकारे विना शस्त्रक्रिया गुडघेदुखीसारखा आजार बरा करता येतो. शस्त्रक्रिया तेव्हा करावी लागते जेव्हा गुडघ्याच्या आवरणातील कार्टिलेजची पातळी पूर्ण कमी होते. जेव्हा कोणतेही इतर उपचार गुडघेदुखीवर काम करत नाही तेव्हा शस्त्रक्रिया हा शेवटचा उपचार असतो. विनाशास्त्रक्रिया उपचारपद्धती खर्चिक नसून हानीकारकही नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याअगोदर प्रत्येकाने हा उपचार घ्यावा.
– (डाॅ. गणेश सिंह चव्हाण, अस्थिरोगतज्ज्ञ; डाॅ. चव्हाण ऑर्थोक्लिनीक, चमणलाल काॅम्प्लेक्स, सिंहगड रोड, आनंदनगर,पुणे, संपर्क क्र. 9373981247 )
-शब्दांकन : प्रियांका माळी
डाॅ. गणेश चव्हाण यांची गुडघेदुखीविषयी महत्वाची माहिती पाहा व्हिडीओ –