Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

गुगल सर्च रिजल्टमधून स्वतःची वैयक्तिक माहिती कशी हटवायची ?

by प्रभात वृत्तसेवा
September 29, 2022
in लाईफस्टाईल
A A
गुगल सर्च रिजल्टमधून स्वतःची वैयक्तिक माहिती कशी हटवायची ?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगात आपल्या गोपनीयतेचे संरक्षण करणे हे एक मोठे आव्हान आहे. आपल्यापैकी बरेच जण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडियावर नाव, फोन नंबर, पत्ता आणि ईमेल पत्ता इत्यादी माहिती शेअर करतात. या मोठ्या वेबसाइट्स आहेत आणि त्यांचे गोपनीयता धोरण मजबूत असले तरीही अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करत नाहीत.

अशा परिस्थितीत तुमची वैयक्तिक माहिती अगदी बँक तपशील देखील ऑनलाइन होतात. जेव्हा हे तपशील गुगलवर ( Google ) दिसू लागतात तेव्हा सर्वात मोठी समस्या असते. चला तर, आज आम्ही तुम्हाला गुगल शोध परिणामांमधून (गुगल सर्च रिजल्ट) ही वैयक्तिक माहिती कशी काढायची ते सांगू. चला सोप्या पद्धतीने समजून घेऊया.

गुगलने ( Google ) नुकतीच युजर्ससाठी ‘Results About You’ ही सुविधा सुरू केली आहे. हे फिचर गुगलवरून वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती काढून टाकण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती स्वतः हटवू शकता. यासाठी तुम्हाला गुगल सपोर्ट पेजवर जावे लागेल, त्यानंतर सर्च रिझल्टमधून तुम्हाला जी URL काढायची आहे त्याचा उल्लेख करणारा फॉर्म भरा. तुम्ही या फॉर्ममध्ये एकाच वेळी अनेक URL देखील जोडू शकता. यानंतर गुगल या पेजेसची पडताळणी करेल आणि जर तुम्ही दिलेली माहिती बरोबर असेल तर ती बंद केली जाईल. तथापि, या प्रक्रियेस थोडा वेळ लागू शकतो.

वेबसाइटवरून अशाप्रकारे थेट हटवा

वैयक्तिक माहिती हटवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे त्या पृष्ठावर थेट भेट देऊन माहिती हटविण्याची विनंती करणे. यासाठी तुम्हाला URL च्या शेजारी असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करावे लागेल आणि नंतर या निकालाच्या विषयी पृष्ठावर जावे लागेल. येथून रिमूव्ह रिझल्ट या पर्यायावर क्लिक करा. यानंतर पेज काढण्याची प्रक्रिया सुरू होईल. ( How to remove your personal information from Google search results )

याप्रमाणे विनंतीचा मागोवा (रिक्वेस्ट ट्रॅक) घ्या

या दोन्ही प्रक्रियेनंतर तुम्ही तुमच्या रिक्वेस्टला ट्रॅक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल ( Google ) ऍपवर जाऊन रिजल्ट्स अबाऊट यू (Results About You) वर जावे लागेल आणि तुम्ही तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करताच तुम्हाला विनंतीचे स्टेटस पाहता येईल. इतकंच नाही तर इथे रिक्वेस्ट स्टेटस पाहण्यासोबतच तुम्ही नवीन रिमूव्ह रिक्वेस्ट देखील जोडू शकता.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar