Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरवरून ‘हा’ लोकप्रिय गेम का झाला गायब ?

by प्रभात वृत्तसेवा
July 29, 2022
in लाईफस्टाईल
A A
गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरवरून ‘हा’ लोकप्रिय गेम का झाला गायब ?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) हे लोकप्रिय गेम अचानक गुगल प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅपवरून गायब झाले आहे. स्टोअरमधून BGMI गायब झाल्यामुळे गेम खेळाडू नाराज आहेत आणि BGMI हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. 2020 मध्ये पबजी (PUBG) वर बंदी घातल्यानंतर, BGMI हा PUBG चा नवीन अवतार म्हणून लॉन्च करण्यात आला आहे.

स्टोअरमधून बीजीएमआय काढून टाकण्याची कोणतीही सूचना दिली गेली नाही. गुगलने प्ले स्टोअरवरून ‘बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया’ काढून टाकण्यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. गुगलने सरकारच्या आदेशानंतर बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया आपल्या अॅप स्टोअरमधून काढून टाकल्याचे म्हटले आहे. अलिकडेच गेमशी संबंधित काही घटनांमुळे अॅपवर बंदी घालण्यात आल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.

वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’च्या म्हणण्यानुसार, गुगलच्या प्रवक्त्याने पुष्टी केली आहे की ते बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया काढून टाकण्याच्या सरकारी आदेशाचे पालन करत होते. मात्र अॅप का काढण्याची सूचना देण्यात आली होती, सध्या या संदर्भात सविस्तर माहिती उपलब्ध नाही.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की हा गेम विकसित करणार्‍या क्राफ्टन कंपनीने बीजीएमआय भारतात लाँच होण्यापूर्वी चिनी कंपनीशी आपले संबंध तोडले होते आणि स्पष्ट केले होते की, भारतीय वापरकर्त्यांचा डेटा भारतातच संग्रहित केला जाईल आणि वापरकर्त्यांची गोपनीयता राखली जाईल. त्यासंदर्भात पुरेपूर काळजी घेतली जाईल. कंपनीने भारतात या गेमसाठी $100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. त्याच्या वापरकर्त्यांच्या संख्येने 100 दशलक्षचा टप्पा ओलांडला आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar