Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘गुगल’ला अँडॉईड ‘प्ले स्टोर’मधून मिळतात ‘इतके’ हजार कोटी; आकडा वाचून डोळे पांढरे होतील…!

by प्रभात वृत्तसेवा
August 31, 2021
in लाईफस्टाईल
A A
‘गुगल’ला अँडॉईड ‘प्ले स्टोर’मधून मिळतात ‘इतके’ हजार कोटी; आकडा वाचून डोळे पांढरे होतील…!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

गुगलच्या स्वतःच्या अँड्रॉईड ऍप प्ले स्टोअरच्या माध्यमातून  2019 मध्ये तब्ब्ल 11.2 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 82 हजार 320 कोटी कमावले आहेत. गुगल प्ले स्टोअरच्या इतिहासात पहिल्यांदाच गुगलने प्ले स्टोअरमधून कमाई सार्वजनिक केली आहे. गुगलने अमेरिकेच्या न्यायालयात ही माहिती दिली आहे. 22 ऑक्टोबर 2008 रोजी गुगल प्ले लाँच करण्यात आले, ज्याला नंतर ‘गुगल प्ले-स्टोअर’ असे नाव देण्यात आले.

ऍप स्टोअरवरील ‘अविश्वास उल्लंघन’ (एंट्रीट्रस्ट वॉयलेशन) या आरोपाखाली यूटा आणि इतर 36 अमेरिकन राज्ये आणि जिल्ह्यांनी ‘गुगल’वर खटला दाखल केल्यानंतर गुगलने आपली प्ले स्टोअरची कमाई सार्वजनिक केली आहे. यामध्ये ऍपमधील खरेदी आणि जाहिरात कमाईचा समावेश आहे.

2022 च्या अखेरीस गुगलला आणखी एका चौकशीला सामोरे जावे लागू शकते, कारण अनेक कंपन्यांनी प्ले स्टोअरवर ऍप्स विकण्याच्या आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, गुगलवर ऍप स्टोअरची मक्तेदारी असल्याचा आरोप आहे.

गुगल प्ले स्टोरीवरून कसे कमवते?

सहसा, आपण विनामूल्य ऍप डाउनलोड करताना कमाईबद्दल विचार करत नाही, परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की गुगलला सर्वाधिक कमाई विनामूल्य ऍपमधूनच होते. गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड केलेले 98 टक्के ऍप्स मोफत आहेत. टॉप 8 गेमिंग ऍप्सचा समावेश प्ले स्टोअरवरील टॉप 10 सर्वाधिक कमाई करणाऱ्या ऍप्समध्ये होतो, हे विशेष !

गुगल प्ले स्टोरवर ऍप्सच्या यादीत येण्यासाठीही तुम्हाला पैसे द्यावे लागतात. ऍप  डेव्हलपर्सना प्ले स्टोअरवर ऑपरेशन किंमत म्हणून 25 डॉलर किंवा 1,830 रुपये द्यावे लागतात. या व्यतिरिक्त, काही ऍप्स सशुल्क असतात. म्हणजे ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात.

या व्यतिरिक्त, ई -बुक्स देखील सशुल्क असतात, जे गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड केले जातात. अनेक कंपन्या त्यांच्या ऍप्सच्या प्रमोशनसाठी पैसेही देतात, ज्यातून गुगल कमावते. आपल्याला गुगल प्ले स्टोअरवर चित्रपट पाहण्यासाठीदेखील पैसे द्यावे लागतात.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar