Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

गाव नकाशा आता ऑनलाइन – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
January 10, 2022
in लाईफस्टाईल
A A
गाव नकाशा आता ऑनलाइन – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे –राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने सर्व्हेनंबर निहाय गाव नकाशा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला आहे. यासुविधेमुळे संबंधित गावामध्ये जमीन कुठे आहे, जमिनीच्या चतु:सिमा, आजबाजूचे गटनंबर आणि मालक कोण आहेत, याची माहिती घरबसल्या एका क्‍लिकवर उपलब्ध होत आहे.

ऑनलाइन सातबारा उतारा, आठ “अ’, फेरफार आदी सुविधांबरोबरच सर्व्हेनंबरनिहाय गावाचा नकाशा महाभूनकाशा या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी गाव नकाशाची माहिती गाव तलाठ्याच्या कार्यालयात जाऊन घ्यावी लागत होती. त्याची आता गरज लागणार नाही. सातबारा उतारा गाव नकाशाशी लिंक केल्यामुळे राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्याही तालुक्‍यातील अथवा गावातील जमिनींची अक्षांक्ष-रेखांक्षसह (जीपीएस) सर्व माहिती नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होणे शक्‍य झाले आहे.

सर्व्हेनंबरनुसार गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे जमिनीचे स्थान निश्‍चितीसाठी ही माहिती उपयुक्‍त ठरणार आहे. त्याचबरोबर संबंधित सर्व्हेनंबरवर मालकी कोणाची आहे हे समजणार आहे. राज्यात एकूण 44 हजार 278 गावे असून त्यापैकी 36 हजार 500 गावचे नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उर्वरित गावांचे नकाशा लवकरच ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती ई-फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक व उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.

असा शोधा नकाशा
सर्व्हेनंबरनुसार गाव नकाशा हीींिी://ारहरलर्हीपरज्ञरीहर.ारहरलर्हीाळ.र्सीें.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध
या संकेतस्थळावर गेल्यावर पहिल्यांदा जिल्हा निवडा, तालुका आणि त्यानंतर गाव निवडा
यानंतर गाव नकाशा हा पर्याय निवडा
गाव नकाशा उपलब्ध होईल
संबंधित सर्व्हेनंबर टाकल्यावर त्या क्षेत्राचा नकाशा पीडीएफमध्ये उपलब्ध होईल
नकाशाची प्रिंट काढता येणार आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar