ज्या लोकांच्या गालावर खळी किंवा डिंपल असतात, ते खूप देखणे दिसतात कारण डिंपल्समुळे त्याचे सौंदर्य वाढते. त्यांना पाहून इतर लोकही विचार करतात की आपल्याही गालावर असेच मोहक डिंपल्स असायला हवेत. पण तुम्हाला माहित आहे का की ज्यांच्या गालावर हे डिंपल दिसतात, त्याचे नेमके कारण काय आहे? हे एखाद्या आजाराचे लक्षण असते का? की जेव्हा चेहऱ्यावरील रक्तवाहिनी काही कारणाने लहान राहते, तेव्हा हसताना चेहरा खेचला गेल्यामुळे डिंपल्स दिसतात. जेणे करून त्या लहान शिरेची कमतरता भरून काढता येईल. वास्तविक डिंपल तेव्हाच चेहऱ्यावर येते, जेव्हा मूल आईच्या उदरात असते. परंतु स्नायूंची कमतरता हे काही रोगाचे कारण आहे.
खळी पडण्यामागे ‘हे’ आहे मुख्य कारण
आजपर्यंत प्रत्येकाने गालावर डिंपल्स पाहिले असतील, परंतु डिंपल फक्त गालावरच नाही तर शरीराच्या प्रत्येक भागात असतात. पण बहुतेकवेळा डिंपल फक्त चेहऱ्यावरच दिसतात. यामागील जैविक तथ्य जाणून घेऊया. वास्तविक हे सर्व स्नायूंच्या कमतरतेमुळे पडतात. याचे आणखी एक कारण म्हणजे ते अनुवांशिकही आहेत. पालकांच्या चेहऱ्यावर डिंपल असेल तर त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरही डिंपल असते.
अनेक बॉलिवूड स्टार्सनाही गालावर डिंपल दिसतात. पण यानेही त्यांना काही फरक पडत नाही. कारण डिंपल असण्याने त्यांचे सौंदर्य आणखी वाढते. हा असा कोणताही आजार नाही की ज्यामुळे एखाद्याचा जीव जाईल, खरं तर हा एक किरकोळ विकार आहे. जे काही लोकांच्या चेहऱ्यावर जन्मापूर्वीच येते आणि हे देखील खरे आहे की अनुवांशिकतेमुळे देखील चेहऱ्यावर डिंपल्स दिसतात. आणि डिंपल्समुळे लोक खूप गोंडस दिसतात.
The post गालावर खळ्या का दिसतात ? जाणून घ्या त्यामागील रंजक कारण appeared first on Dainik Prabhat.
