गाउट या आजारात पायाच्या अंगठ्याला सूज येते. नंतर काही काळ पावले, घोटा, गुडघे, हात, मनगट, कोपर यापैकी कोणतेही सांधे सुजतात. या सांध्यांमधून तीव्र वेदना होऊ लागतात. रात्री या वेदना अधिक तीव्र होतात. याबरोबरच भूक न लागणे, अशक्तपणा, थकवा, आळस या तक्रारीही जाणवतात. काही वेळाने सांध्याची सूज कमी होते. जास्त दिवसांच्या आजारामुळे सांधे दुखणे, जखडणे इत्यादी तक्रारी निर्माण होतात. हा आजार टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. या आजारावर उपचार शक्य असले तरी तो होऊ नये यासाठी आधीच काळजी घेणे आवश्यक आहे
गाउट या आजारात पायाच्या अंगठ्याला सूज येते. नंतर काही काळ पावले, घोटा, गुडघे, हात, मनगट, कोपर यापैकी कोणतेही सांधे सुजतात. या सांध्यांमधून तीव्र वेदना होऊ लागतात. रात्री या वेदना अधिक तीव्र होतात. याबरोबरच भूक न लागणे, अशक्तपणा, थकवा, आळस या तक्रारीही जाणवतात. काही वेळाने सांध्याची सूज कमी होते. जास्त दिवसांच्या आजारामुळे सांधे दुखणे, जखडणे इत्यादी तक्रारी निर्माण होतात. हा आजार टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. या आजारावर उपचार शक्य असले तरी तो होऊ नये यासाठी आधीच काळजी घेणे आवश्यक आहे.
उट’ हा आजार जास्त प्रमाणात आढळत नसला तरीही सांध्याच्या विकारामुळे तो होतो. यावरचे उपचार कोणते आणि हा आजार म्हणजे नेमके काय हे जाणून घेणे उपयोगाचे ठरते. चयापचयाच्या क्रियेत बिघाड झाल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे क्षार शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी साठू लागतात. त्यामुळे तेथील भाग फुगल्यासारखा होतो. त्याला गाउट म्हणतात. हे क्षार सांध्यामध्ये साठू लागल्यास त्याला वैद्यकीय भाषेत “गाउटी अथ्रायटीस’ असे म्हणतात. हा संधिवाताचाच प्रकार असून हे क्षार स्नायू मांसपेशीमध्येही साठू शकतात. हे क्षार मूत्रवाहिन्यांमध्ये साठल्यास संबंधित व्यक्तीला मूतखड्याचा विकार होण्याची शक्यता असते.
गाउट होण्यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात. स्थूलपणा, अतिरिक्त चरबी, उच्च रक्तदाब, किडनीच्या कार्यक्षमतेमध्ये कमतरता, जास्त मद्यपान, लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे आणि इतर काही औषधांमुळे होणारे दुष्परिणाम यामुळे चयापचयाच्या क्रियेत बिघाड होतो. परिणामी, शरीरातील युरिक ऍसिडचे उत्सर्जन कमी होते. ते बाहेर टाकले जात नसल्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण वाढलेले दिसते. युरिक ऍसिड वाढण्याचे आणखी कारणे म्हणजे सोरायसीस किंवा हिमोलायटीक ऍनिमिया. या सारख्या आजारात पेशींची उलाढाल वाढते तर काही वेळा अनुवंशिकतेने येणाऱ्या चयापचय दोषामुळेही युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते. स्त्रियांमध्ये मॅनोपॉज पूर्वी तर पुरुषांमध्ये वयात येण्यापूर्वी क्वचित वेळी हे प्रमाण वाढते.
युरिक ऍसिडचे सर्वसामान्य प्रमाण आठपर्यंत असते. हे प्रमाण वाढल्यास वेगवेगळ्या सांध्याशी निगडित असणाऱ्या तसेच स्नायूंशी निगडित असणाऱ्या तक्रारी उत्पन्न होऊ लागतात. त्या विकारालाच गाउट असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये गाउट होण्यामागची बरीच कारणे सांगितली आहेत. आंबट, तिखट, खारट, मसालेदार पदार्थांचा खूप जास्त वापर, नियमित मांसाहार, अधिक मद्यपान, अधिक प्रमाणात कंदमुळांचा वापर, अनियमित आणि प्रमाणापेक्षा जास्त आहार घेणे, स्थूलपणा, दिवसा झोपणे, रात्री उशिरा झोपणे अशी काही कारणे त्यामागे आहेत. या प्रमाणेच प्रतिकारशक्ती कमी असलेल्या आणि फारसे कष्ट नसलेल्या व्यक्तींना ते अधिक प्रमाणात होते असेही सांगितले आहे. आयुर्वेदामध्ये या आजाराला वातरक्त असे म्हटले आहे. वेगवेगळ्या कारणामुळे शरीरातील रक्त दूषित झाल्यास शरीरात वातदोषाचे प्रमाण वाढते आणि बिघडलेला हा वात आणि दोष निर्माण झालेले रक्त यातून हा आजार उद्भवतो. म्हणूनच वरील कारणे टाळली तर या आजाराला दूर ठेवणे फारसे अवघड नाही.
गाउट हा आजार वाताशी निगडित आहे. रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे संबंधित व्यक्तीमध्ये शस्त्रक्रिया, वारंवार आजारपण, अचानक वजन कमी होणे, शारीरिक ताण, अती आहार, जास्त मद्यपान, यासारख्या कारणांमुळे सांध्याच्या तक्रारी निर्माण होतात आणि मग पुढे गाउटचे निदान झाल्याचा निष्कर्ष निघतो. बऱ्याच लोकांच्या पायाच्या अंगठ्याला सूज येते. नंतर काही काळ पावले, घोटा, गुडघे, हात, मनगट, कोपर यापैकी कुठेही सांधे सुजतात. या सांध्यांमधून तीव्र वेदना होऊ लागतात. रात्री या वेदना अधिक तीव्र होतात. या बरोबरच भूक न लागणे, अशक्तपणा, थकवा, आळस या तक्रारीही जाणवतात. काही वेळाने सांध्याची सूज कमी होते. जास्त दिवसांच्या आजारामुळे सांधे दुखणे, जखडणे या तक्रारी निर्माण होतात. तसेच कान, नाक, डोळ्यांच्या पापण्या या भागात फुगवटे येऊन ते थोडे जाड दिसतात. काही व्यक्तींच्या हातांच्या तळव्यावर पांढरट रेषा दिसतात. या रुग्णांमध्ये बरेचदा मुतखड्याचा त्रास, किडनीची कार्यक्षमता कमी होणे, लठ्ठपणा, रक्तदाब वाढणे आणि काही वेळा हृदयविकार या तक्रारीदेखील दिसून येतात.
सुरुवातीच्या काळात सांध्यांना सूज आली आणि वेदना जाणवू लागल्या तर रक्तातील युरिक ऍसिडची तपासणी केली जाते. त्याचे प्रमाण वाढलेले असल्यास गाउट आजाराचे निदान पक्के होते. निदान झाल्यानंतर युनिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी तज्ज्ञांकडून मुख्य औषधांसोबत वेदनाशामक औषधेही दिली जातात. या औषधांनी युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे रुग्णाला आराम मिळतो. आयुर्वेदातही या आजारावर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या इलाजांचा उल्लेख केलेला आढळतो. आयुर्वेदामध्ये अशा रुग्णांची योग्य तपासणी करून मगच उपचार ठरवले जातात. हे उपचार स्थानिक उपचार, औषधी उपचार, पंचकर्म आणि पथ्यपालन अशा सर्व स्वरूपात केले जातात.
सांध्यांची सूज कमी होण्यासाठी विविध वस्तूंचा लेप लावला जातो. वेगवेगळ्या औषधी तेलाने सांध्यांना आणि स्नायूंना मसाज केला जातो. तर काही वेळा आयुर्वेदिक पद्धतीने शेकही दिला जातो. आजाराचे स्वरूप जास्त असेल तर मूळ पचनक्रियेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी तैलबस्ती, निरूह बस्ती, विरेचन, लक्तामेक्षण यापैकी आवश्यक असणारे उपाय केले जातात. हे उपचार करताना रुग्णाची शारीरिक क्षमतादेखील बघितली जाते. रुग्णाला औषधी उपचार करताना गुळवेल, मंजिष्ठा, सारीवा, निरगुडी, सुरंजन, शतावरी, एरंड, गुगुळ, दशमोल, गोखरू, रासना या वनस्पतींनी बनवलेली औषधे तसेच काही भस्मांपासून बनवलेली औषधे दिली जातात. हे उपचार युरिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरतात. शास्रोक्त पद्धतीने मसाज केल्यास सांध्यांमधील वेदना, जखडलेपण, सूज कमी होते आणि अवयवांची हालचाल करणे वेदनारहित हाते.
पथ्य पाळा
आजार कुठलाही असला तरी त्यावर पथ्य पाळणे हे तो आजार बरा होण्यासाठी खूप उपयोगाचे ठरते. गाउट हा आजार झालेल्या रुग्णानेदेखील योग्य प्रकारे पथ्य पाळावे. उपचार यशस्वी होण्यासाठी आणि नंतर आजार बरा झाल्यावर तो पुन्हा होऊ नये म्हणून पथ्य खूप महत्त्वाचे ठरते. पथ्य पाळताना जास्त तिखट, तळलेले पदार्थ खाऊ नयेत. तसेच दही, लोणचे, खूप जास्त मांसाहार, वात वाढवणारे पदार्थ म्हणजे वाटाणा, पावटा इत्यादी कटाक्षाने टाळावेत. वेळेवर खावे आणि वेळेवर झोपावे. दिवसा झोपू नये. जास्त प्रवास, खूप जास्त व्यायाम, उन्हा-तान्हात फिरणे या गोष्टीही टाळाव्यात.
– डॉ. संतोष काळे
The post गाउटला करा आऊट appeared first on Dainik Prabhat.