Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

गर्भनिरोधक गोळी घेण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? Pregnancy टाळण्यासाठी ‘या’ प्रकारे वापर करा

by प्रभात वृत्तसेवा
April 6, 2022
in आरोग्य वार्ता
A A
गर्भनिरोधक गोळी घेण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? Pregnancy टाळण्यासाठी ‘या’ प्रकारे वापर करा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

या गोळ्यांना सामान्यपणे “मॉर्निंग आफ्टर पिल’ म्हणून ओळखले जाते. मुळात हा संप्रेरकांचा उच्च तीव्रतेचा डोस आहे. शरीराच्या संप्रेरकांच्या चक्रात हस्तक्षेप करून या चक्रादरम्यान अंडाशयातून अंडे बाहेर पडण्यास प्रतिबंध केला जातो. मात्र, ही गोळी घेण्यापूर्वीच अंडाशयातून स्त्रीबीज बाहेर पडले असेल तर ही पद्धत उपयोगी पडत नाही. त्याचप्रमाणे एका मासिक चक्रादरम्यान दुसऱ्यांदा ही गोळी घेतल्यास तिचा काहीच उपयोग होत नाही. असुरक्षित शारीरिक संबंधानंतर 48 तासांच्या आत ही गोळी घेतली गेली तरच तिचा उपयोग होऊ शकतो.

गर्भाशयांतर्गत उपकरण (आययूडी) :
याला सामान्य भाषेत “कॉपर-टी’ म्हणून ओळखले जाते. असुरक्षित शारीरिक संबंधानंतर एकशे वीस तासांच्या आत या उपकरणांचा वापर केला असता गर्भधारणा टाळली जाण्याची शक्‍यता असते. अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील वापरामुळे गर्भधारणेला प्रतिबंध केला जातो. या पद्धतीचा आणखी एक फायदा म्हणजे जोपर्यंत हे गर्भनिरोधक उपकरण गर्भाशयातून काढले जात नाही तोपर्यंत गर्भधारणा होण्याची शक्‍यता नसते.

या गोष्टी कटाक्षाने पाळा…
तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी कधीही घेऊ नये. यातील काही औषधे ही प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जात असली, तरी तुम्ही डॉक्‍टरांना भेटूनच ही औषधे घेणे आवश्‍यक आहे. शरीरावर या गोळ्यांचा विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे या गोळ्या घेण्याची खरच गरज आहे का, याची चाचपणी करा. तुमच्या गरजा व प्राधान्यांविषयी डॉक्‍टरांशी मोकळेपणाने चर्चा करू शकता. म्हणजे ते तुम्हाला योग्य असा दीर्घकालीन गर्भनिरोधकांचा इतर पर्याय सुचवू शकतात.

आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांचे दुष्परिणाम
काही स्त्रियांना आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी घेतल्यानंतर मळमळ किंवा उलटीचा त्रास होऊ शकतो. गोळी घेतल्यानंतर तीन तासांच्या आत उलटी झाल्यास, डोस पुन्हा घेण्याची आवश्‍यकता असते. मासिक पाळीच्या चक्रात काही बदल होण्याची शक्‍यता असते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar