[[{“value”:”
पुणे : पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील नावाजलेल्या गंगोत्री होम्सतर्फे शनिवार, दि. ३० नोव्हेंबर ते शनिवार, दि. ७ डिसेंबर २०२४ या कालावधीत ‘कासा प्रॉपर्टी फेस्टिव्हल 3.0’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव पुण्यात होणार आहे. या सात दिवसीय गृह महोत्सवात गंगोत्री होम्स ॲण्ड हॉलिडेज्च्या विविध प्रकल्पांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
उद्घाटन सोहळा
हा कार्यक्रम हर्षल बॅन्क्वेटस्, कर्वे रोड, कोथरूड येथे होणार आहे. कासा प्रॉपर्टी फेस्टिव्हल 3.0 चे उद्घाटन दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता होईल. या उद्घाटन सोहळ्यास मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश आसबे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक सतिश कुमार उपस्थित राहणार आहेत.
विविध प्रकल्पांची माहिती
गंगोत्री होम्स सध्या पुण्यातील विविध मध्यवर्ती भागांमध्ये प्रकल्प उभारत आहे. त्यामध्ये डहाणुकर कॉलनी, कर्वेनगर, मयूर कॉलनी, मृत्युंजय कॉलनी, प्रभात रोड, एफ. सी. रोड, बाणेर, रामबाग कॉलनी आणि नवी सदाशिव पेठ या भागांचा समावेश आहे.
या प्रदर्शनात गंगोत्री होम्सचे गृहप्रकल्प, विकेंड होम्स आणि ऑफिसेस यांची माहिती एकाच छताखाली पाहता येणार आहे. प्रदर्शन दरम्यान ग्राहकांसाठी खास योजना उपलब्ध असतील.
प्रदर्शनाची वेळ
प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, ते सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सुरू असेल. पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि विशेष योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्नेहमेळावा
रविवार, दि. १ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता गंगोत्री परिवारातील ग्राहक आणि सुहृदांसाठी वार्षिक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या स्नेहमेळाव्याला महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
The post गंगोत्री होम्सतर्फे ‘कासा प्रॉपर्टी फेस्टिव्हल 3.0’चे पुण्यात आयोजन appeared first on Dainik Prabhat.
“}]]