Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

क्षय व दम्याचा नाश करणारे उत्तमांगासन – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 29, 2021
in आरोग्य वार्ता
A A
क्षय व दम्याचा नाश करणारे उत्तमांगासन – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

उत्तमांगासन हे एक बैठक स्थितीतील अवघड आसन आहे. नियमित योगासने करून शरीर लवचिक व बलवान बनवण्यासाठी हे आसन तज्ञ योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाशिवाय करू नये. दमेकरी व क्षयरोगी, जर हे उत्तम अंगाचे आसन रोज करतील तर त्यांचे शरीर आरोग्य पूर्ण होईल. उत्तम प्रकृती होईल.

  • पहिल्यांदा पदमासन घालावे.
  • मग दोन्ही गुडघे छातीजवळ न्यावे.
  • दंड व छातीमधे गुडघे दाबून शरीर अशाप्रकारे उचलावे की संपूर्ण शरीराचा भार हा दोन्ही हातांवर येईल.
  • शरीर वर उचलताना हाताचे पंजे चांगले पसरून पाया भक्‍कम करावा.
  • भरपूर श्वास घेतच शरीर उचलावे.
    -मग श्वास रोखावा.
  • मग हळूहळू श्वास व शरीर पूर्वस्थितीत आणावे.

हे आसन करायला अवघड पण प्रयत्नाने जमू शकते. सुरूवातीला 2 ते 5 मिनिटे देखील टिकू शकते.
या उत्तमांगासनामुळे हात पाय मजबूत होतात. स्नायू तसेच हाडेदेखील सुदृढ होतात. छातीची दुर्बलता नष्ट होते. छाती व पोटाचे विकार बरे होऊन सुदृढ व कार्यक्षमता वाढते. रोज जर योग्य योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली या आसनाचा सराव नियमित केला तर क्षय पूर्णत: बरा होतो. दमाही जातो.

पण मूळात शरीराचा तोल सांभाळणे कठीण असते. हे एक तोलात्मक आसन असले तरी अगदी रोजच्या अभ्यासाने जाड व्यक्तीसुद्धा शरीराचा भार उचलू शकतात. आसनाचा कालावधी क्रमाक्रमाने वाढवावा. ऑपरेशन अथवा जखम झालेल्या व्यक्तींनी डॉक्‍टरी सल्ल्याशिवाय हे आसन करू नये.

पुरेशी शारिरीक क्षमता असल्याशिवाय योगी पुरूष आचार्य हे आसन करण्याचा सल्ला देत नाहीत. तेव्हा सावधान दृढनिश्‍चय हवा व दमा व क्षय समूळ जाण्याची तळमळ हवी तरच आसन आदर्श करता येते. उगाचच अघोरी प्रकारांनी ह्याची आदर्शावस्था करू नये. सहज सुलभ करता आले पाहिजे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar