आपल्यापैकी कोणाही कधीही महामारीत साथीच्या रोगाने जगण्याची कल्पनासुद्धा केली नव्हती; परंतु या प्राणघातक विषाणूशी लढताना जग खरोखरच थांबले आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, हा विषाणू संपूर्ण जगभर पसरला आहे आणि त्याने आपल्या सर्वांना अर्थात संपूर्ण जगाला घरात बसायला भाग पाडले आहे. आम्हाला वारंवार सांगितले जात आहे की, वृद्धांना ह्यात सर्वात जास्त धोका कसा आहे. आपल्या सर्वांनी आपल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी कशी घ्यावी हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
ज्येष्ठ अधिक असुरक्षित का आहेत?
जसजसे आपले वय होते तसतसे आपली रोग प्रतिकारकशक्ती कमकुवत होत जाते. आपल्या वाढत्या वयात वृद्ध लोक व्हायरस (विषाणू) पासून संक्रमित होण्यास अधिक प्रवृत्त होतात.
घरीच राहा आणि आपले हात वारंवार धुवा या सल्ल्याशिवाय आम्ही एक यादी तयार केली ज्यात लॉकडाऊनमध्ये काय करावे किंवा काय करू नये, हे सोप्या मार्गाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
काय करावे ?
पपौष्टिक आहार घ्या. ज्यात समावेश असेल…
पघरी शिजवलेले ताजे गरम जेवण.
पखूप पाणी प्यावे.
पप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ताज्या फळांचे रस प्यावे.
पदिवसातून कमीतकमी दोनदा 1 चमचे आले पावडर घ्यावी.
पजेवणाच्या आहारात काळ्या मिरीचा समावेश असावा किंवा दिवसातून दोनदा.
पशाकाहारी सूप ज्यात काळ्या मिरीचा समावेश असेल ते प्यावे.
पताजी फळं, ताज्या भाज्यांचा सकस आहार घ्यावा.
पसक्रिय राहा – व्यायाम करा आणि ध्यान करा.
जेव्हा आपल्याला बाहेर जाण्याची सक्त मनाई असते तेव्हा व्यायाम करणे कठीण होऊन जाते; परंतु आपल्या घरामध्ये फिरून सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला शक्य असेल तर, कोणाच्या देखरेखीमध्ये थोड्या हलक्या प्रमाणात व्यायाम करा, दिवसातून थोडा वेळ शिड्या चढा-उतरा.
औषध घेण्यास विसरू नका
आपल्या डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमितपणे घ्या, जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत ती थांबवू नका. आपल्या डॉक्टरांशी फोनवर बोला आणि आपल्या आरोग्याबद्दल योग्य ती माहिती घेत राहा. आपणास मधुमेह असल्यास, घरीच आपल्या साखरेची पातळी तपासा. यावेळी आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी सर्व उपाय करा.
सतत संपर्कात राहा
कॉल किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या कुटुंबातील सदस्यांशी बोला (जे तुमच्याबरोबर राहात नाही), नातेवाईक, मित्र, आवश्यक असल्यास कुटुंबातील सदस्यांची मदत घ्या.
शक्यतो डॉक्टरांची भेट टाळा
आपत्कालीन परिस्थिती येईपर्यंत आपल्या पर्यायी शस्त्रक्रिया आणि नियमित आरोग्य तपासणी पुढे ढकला. स्वत:ला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फोन, व्हाटस्एप किंवा ईमेलद्वारे आपल्या डॉक्टरांशी संपर्कात राहा.
जंतुनाशके वापरा
नियमितपणे वारंवार स्पर्श केलेल्या जागा व वस्तू जंतुनाशकाने स्वच्छ करा. सॅनिटायझर नेहमीच स्वतःजवळ ठेवा. बाहेरून खरेदी केलेल्या वस्तू, फळ, भाज्या इत्यादीला स्पर्श केल्यानंतर नेहमीच हात धुवा किंवा हात स्वच्छ करणारे सॅनिटायझर वापरा. आपला परिसर स्वच्छ ठेवा. आपल्या चेहऱ्यास वारंवार स्पर्श करू नका.
स्वतःची काळजी घ्या
आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवा. आपणास ताप, खोकला आणि / किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास जवळच्या आरोग्य सेवा केंद्राशी त्वरित संपर्क साधा वैद्यकीय सल्ल्याचे पालन करा.
काय करू नये?
तळलेले, बंदिस्त केलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा.
प्रत्येक वेळी जेव्हा आपण बाहेरून काहीतरी खरेदी करता
भाज्या, फळे, ब्रेड, दूध इत्यादी, आपण ते निर्जंतुकीकरण केल्याची खात्री करून घ्या. आपण पॅकेट खाली ठेवून डेटॉलने पुसून घेऊ शकता किंवा ज्या पाण्यात तुम्ही काही बेकिंग सोडा घातला आहे त्या पाण्यात फळे आणि भाज्या धुवा. असे केल्यावर आपले हात स्वच्छ धुवा.
आपल्या उघड्या हातात किंवा आपला चेहरा झाकल्याशिवाय खोकू किंवा शिंकू नका. आपल्या हाताचे कोपर किंवा रुमाल वापरा. आपल्या जवळच सॅनिटायझर ठेवा, हात स्वच्छ करा.
तुम्हाला ताप आणि खोकला असल्यास कोणाच्या सहवासात जाऊ नका. आपण आजारी असल्यास अंतर राखण्याचा प्रयत्न करा, वेळेत औषधे घ्या आणि डॉक्टरांशी संपर्क साधा. जर तब्येतीत जास्तच बिघाड झाला तर रुग्णालयात जा.
डोळे, चेहरा, नाक आणि जिभेला हाताने स्पर्श करू नका. आपले हात बऱ्याच ठिकाणी स्पर्श करतात, जर आपण त्या हातांनी आपला चेहरा, डोळा इत्यादींना स्पर्श केला तर जंतूंचा सुलभ प्रसार थेट आपल्या शरीरात होऊ शकतो. सतर्क राहा आणि स्पर्श करणे टाळा.
स्वत:च औषधोपचार करू नका. आपण आजारी असल्यास, स्वतःहून औषधे घेऊ नका. आपल्या डॉक्टरांना फोन, व्हाटस्ऍप किंवा ई-मेलवर सल्ला देण्यासाठी विचार करणे कधीही चांगले. जर स्वतःहून घेतलेले ते औषध आपल्यास अनुरूप नसेल तर ते दुष्परिणामांना कारणीभूत ठरू शकते.
हस्तांदोलन टाळा किंवा आपल्या मित्रांना आणि जवळच्या लोकांना मिठी मारणेही टाळा. आपल्या घरात राहणाऱ्या लोकांसोबतही योग्य ते अंतर राखा आणि शक्य तितके डिजिटल व्यवहार करा.
अगदी आवश्यक नसल्यास घराबाहेर जाऊ नका. आपल्या कुटुंबातील दुसऱ्या एखाद्याला किंवा शक्य असल्यास आपल्या आवश्यक वस्तू मिळवण्यासाठी एखाद्या मैत्रीपूर्ण शेजाऱ्याला विचारा.
स्वत:ची काळजी घेणे
स्वत:ची काळजी घेणे यावेळी खूप महत्त्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी आणि आजार टाळण्यासाठी…
निवांत झोप घेणे
पहाटेचा सूर्यप्रकाश घ्या, सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी सकारात्मक बदल आणि चमत्कार करू शकतो. घसा खवखवणे आणि खोकला कमी होण्यास मदत होण्यासाठी गरम शॉवर घ्या आणि गरम
पाणी / द्रव प्या.
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नैसर्गिक उपचार वापरा
हळद दूध
फक्त हंगामी फळे आणि भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. संत्रा, लिंबासारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोग प्रतिकारशक्तीला उत्तेजन देते त्यांना चांगल्या प्रमाणात खा. सर्व तळलेले अन्न, पॅक केलेले अन्न, प्रक्रिया केलेले अन्न आणि गव्हाचे पीठ (मैदा) असलेले अन्न टाळा. हे सर्व रोग प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी ओळखले जातात.
औषधी वनस्पतींपासून मदत
आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधी वनस्पती फायदेशीर ठरतात. आयुर्वेदात अद्भुत प्रतिकारशक्ती वाढविणारे अनेक औषधी वनस्पती उपलब्ध आहेत. जर आपण आयुर्वेदाने स्वत:ला बरे करत असाल तर आपल्याकडे यापैकी काही औषधी आधीपासून उपलब्ध असू शकतात!
तुळशी –
तुळशीला आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची राणी म्हटले जाते कारण तिच्या प्रत्येक कणात औषधी गुण असतात. तुलसीमधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटिवायरल गुणधर्म प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात. जेथे करोना व्हायरसचा सर्व प्रथम शिरकाव होतो अशा खोकल्यासारख्या आणि सामान्य सर्दीसारख्या कोणत्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास होत असेल तर त्यावरसुद्धा तुलसी गुणकारी आहे. हे खूप सहजरित्या उपलब्ध आहे आणि ही वनस्पती तुमच्या आहारातसुद्धा समाविष्ट करण्यास उपयुक्त ठरू शकते. मधुमेह असणाऱ्यांनासुद्धा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते
कसे वापरावे?
सकाळी 3 ग्रॅम तुळशी कोमट पाण्यातून घ्या किंवा सकाळी तुळशीची ताजी ताजे पाने चावून खा.
आवळा
आवळामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. हे सर्दी आणि फ्लूसारख्या आजारांना प्रतिबंधित करणारे अनेक हानिकारक व्हायरस आणि बॅक्टेरियाविरुद्ध लढू शकते. हे पुन्हा अगदी सहजतेने उपलब्ध आहे आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या बाबतीत चमत्कारी कार्य करते.
कसे वापरावे?
दररोज सकाळी 1 चमचा आवळा पावडर कोमट पाण्यातून घ्या किंवा, आवळाच्या 1-2 कॅप्सूल सकाळी रिकाम्या पोटी घ्या.
कडूलिंब
कडुलिंबामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात आणि ते आपले रक्त शुद्ध करतात. कडुलिंब व्हायरस पेशींविरुद्ध लढाई करण्यास सक्षम आहे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. सर्वोत्तम परिणामांसाठी आपण दररोज 8-10 कडुनिंबची पाने चघळायला किंवा कडुनिंबाचा चहा पिऊ शकता.
कसे वापरावे?
दररोज सकाळी 1 चमचा कडुलिंबाची पावडर कोमट पाण्याने घ्या किंवा, रिकाम्या पोटी सकाळी कडुलिंबाच्या 1-2 कॅप्सूल घ्या. सुरक्षित राहा आणि सकारात्मक राहा.
– डॉ. त्रिशला चोप्रा