Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कोविड-१९ काळात किडनीचे आजार सांभाळा, जागरूक व्हा – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
August 12, 2021
in आरोग्य वार्ता
A A
कोविड-१९ काळात किडनीचे आजार सांभाळा, जागरूक व्हा – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram
  • डॉ. सुनील जावळे

क्रॉनिक किडनी डिजीज (सीकेडी) हे भारतातील एक मोठी आरोग्य समस्या म्हणून उदयास येत आहे. ही कोविडच्या काळात अधिक गुंतागुंतीचे होते कारण व्हायरल इन्फेक्शन, तज्ञांच्या मते, ७ टक्के ते १५ टक्के रुग्णांमध्ये मूत्रपिंडावर परिणाम होऊन नुकसान होते. जेव्हा मूत्रपिंड ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ चांगले काम करत नाहीत, तेव्हा त्याला क्रॉनिक किडनी डिजीज (सीकेडी) असे म्हणतात. सुरुवातीच्या काळात या आजारामध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. आणि ती लवकर आढळल्यास या आजारावर उपचार करणे सोपे होते.

मूत्रपिंडाच्या आजारांचे काही प्रकार उपचार करण्यायोग्य आहेत. सीकेडी साठी मात्र कोणताही इलाज नाही आणि एकदा किडनी स्वतः कचरा कमी शकत नसेल, तर डायलिसिस आणि प्रत्यारोपणासह अंतिम टप्प्यातील मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार केले जातात. अशा अनेक परिस्थिती आहेत ज्यामुळे सीकेडी होऊ शकतो त्यात प्रामुख्याने रोगप्रतिकार प्रणालीचे रोग आणि पायलोनेफ्रायटिस, मूत्रपिंडात मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा एक प्रकार आहे ज्यामुळे जखमा होतात.

परंतु मधुमेह आणि उच्च रक्तातील साखर हे मुख्य दोषी आहेत. किडनी स्टोनच्या घटना जगभरात वाढत आहेत आणि भारतही याला अपवाद नाही. भारतातील सुमारे १२ टक्के लोकसंख्येमध्ये मूत्रमार्गात स्टोन विकसित होण्याचे प्रमाण आढळून येते , त्यापैकी कमीतकमी ५० टक्के मूत्रपिंड निकामी होतात.

ज्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे त्यांनी नियमितपणे मूत्रपिंडाचे आरोग्य तपासले पाहिजे कारण त्यापैकी बहुधा ३० टक्के रुग्णांमध्ये दीर्घकाळात मूत्रपिंड रोग विकसित होतो. त्याचप्रमाणे जीवनशैलीत काही सोपे बदल करून, मूत्रपिंडाचे आरोग्य सुनिश्चित करणे शक्य आहे, मूत्रपिंडातील स्टोन तयार होण्यापासून रोखण्यासाठी, उच्च-मीठयुक्त आहार, कॅफीन, शुगर आणि एरेटेड पेये, चॉकलेट तसेच दाणे आणि मांसाहार यांचे जास्त सेवन करणे टाळावे.तसेच सद्य परिस्थितीत कोविड -१९ लसीकरण ही सर्वात महत्वाची पायरी आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar