
कोविडवर “नीम कॅप्सुल्स” प्रभावी
June 8th, 9:19amJune 8th, 9:20am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
सध्या कोविड-19 च्या उपचारप्रक्रियेत विविध औषधांचे देशभर संशोधन होत असताना आयुर्वेदातील मान्यतेनुसार रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कडुनिंबाच्या अर्काचा उपयोग होऊ शकतो. सातारच्या निसर्ग हर्ब्जने निर्माण केलेल्या “नीम कॅप्सुल्स’ यासाठी सर्वात प्रभावी ठरल्याचे दिसून आले आहे.
फरीदाबाद येथील ईएसआयसी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल आणि निसर्ग बायोटेक प्रा. लि. सातारा यांनी “एआयआयए’च्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कोविड-19 रुग्णांच्या दैनंदिन निकट संपर्कात येणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचारी तसेच रुग्णांचे नातेवाईक यांच्यावर करण्यात आलेल्या निसर्ग हर्बस् नीम कॅप्सूलचे रोग प्रतिबंधात्मक क्षमतेच्या अंतिम निष्कर्षांची घोषणा करण्यात आली आहे. या संशोधनाअंती असे निदर्शनास आले की, 28 दिवसांसाठी निसर्ग नीम कॅप्सूल दिवसातून दोन वेळा दिल्यास कोविड-19 संसर्ग होण्याची शक्यता ही निम्म्याहून अधिक म्हणजेच 55% कमी होते.
चाचणीतील दोन्ही समूहात बायोमार्कर्स व क्वालिटी ऑफ लाईफ स्थिर राहिलेले दिसून येत आहे. हे संशोधन एकूण 190 लोकांवर डबल ब्लाईंड रॅण्डमाईज्ड प्लासिबो कंट्रोल स्वरूपातील होते. हे सर्व लोक कोविड-19 संसर्ग झालेल्यांच्या कायम संपर्कात होते. सदर चाचणीसाठी संपूर्ण आर्थिक सहाय्य हे निसर्ग बायोटेकच्या रिसर्च सेंटरतर्फे करण्यात आलेले आहे.
या संशोधनातील प्रमुख इन्वेस्टिगेटर एआयआयएच्या संचालिका प्रा.डॉ. तनुजा नेसरी व ईएसआयसी मेडिकल कॉलेजचे डॉ. ए. के. पांडे (MD – Clinical Physiology) यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट ते डिसेंबर 20 या कालावधीत 18 ते 60 वयोगटातील 190 लोकांवर हे संशोधन करण्यात आले. हे संशोधन इन्स्टिट्यूशनल एथिक्स कमिटीचे मान्यता प्राप्त तसेच सीटीआरआय रजिस्टर्ड आहे.
याबाबत ईएसआयसी मेडिकल कॉलेजचे डॉ. अनिल पांडे म्हणाले की, आयुर्वेद शास्त्राचे विविध आजाराच्या रोग प्रतिबंधात्मक उपचारासाठी प्रचंड योगदान आहे. कोविड-19 या संसर्गासाठी सद्यस्थितीत विशिष्ट उपचार उपलब्ध नसताना कोविड-19 विरोधात प्रतिबंधात्मक उपयुक्त उपचाराच्या दिशेने एक उत्तम पाऊल आहे.
लसीकरणाच्या दोन डोसच्या मधील कालावधीत जी संसर्ग होण्याची शक्यता असते, तसेच अतिरिक्त संरक्षण म्हणून संशोधनात वापरलेल्या “निसर्ग हर्ब्ज’च्या नीम कॅप्सूल अत्यंत लाभदायी ठरतील.
कोविड-19 प्रतिबंधासाठी वापरण्यात आलेले हे “निसर्ग नीम कॅप्सूल’ सर्वोत्तम व मान्यताप्राप्त असा सुरक्षित उपचार असल्याचे पाहून आम्हाला आश्वासक व प्रेरणादायी वाटते. बाजारात अनेक सार्स कोव्ह-2 लसींना मान्यता मिळत असली तरी कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत आहे आणि जगभरातील बहुतांश लोकांना अजूनही प्रभावी प्रतिबंधात्मक उपचारांची गरज आहे.
“नीम कॅप्सुल्स’चे हे संशोधन कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपचारासाठी एक वरदानच ठरेल. निसर्ग हर्ब्जची पेटंट पेण्डिंग “नीम कॅप्सूल’ हे आश्वासक पर्याय ठरेल, असे ईएसआयसी मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. आसिम दास म्हणाले.
निसर्ग बायोटेकचे संस्थापक संचालक गिरीश सोमण यांनी सांगितले की, कोव्हिड-19 प्रतिबंधासाठी डबल ब्लाईंड प्लासिबो कंट्रोल्ड चाचणी वरील दोन नामांकित संस्थांच्या सहयोगाने करणारी “निसर्ग बायोटेक’ ही पहिली लहान खासगी कंपनी आहे. नीम कॅप्सूलची प्रतिबंध करण्याची क्षमता लसींच्या कार्यक्षमतेच्या जवळपास म्हणजेच 55% एवढी आहे.
हे संशोधन एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रोफेशनल मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. नीम कॅप्सूलस् 55% प्रतिबंधात्मक कार्यक्षमतेसह कोव्हिड-19 विरोधी प्रतिबंध उपचारासाठी प्रभावी ऍण्टीव्हायरल असल्याचे सिद्ध झाले आहे.
देशामध्ये कोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना तसेच लस मोठ्या प्रमाणात व सुलभतेने उपलब्ध होईपर्यंत आमचे नीम कॅप्सूल कोविड-19 प्रतिबंधासाठी उत्तम पर्याय ठरू शकेल, असे गिरिश सोमण म्हणाले.
(संपर्क : निसर्ग बायोटेक : 9552794004)