Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कोरोनाच्या B.A. 4, 5 व्हेरिएंट्सचा महाराष्ट्रात शिरकाव, पुण्यात आढळले रुग्ण; आरोग्य विभागाची माहिती – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
May 28, 2022
in आरोग्य वार्ता
A A
कोरोनाच्या B.A. 4, 5 व्हेरिएंट्सचा महाराष्ट्रात शिरकाव, पुण्यात आढळले रुग्ण; आरोग्य विभागाची माहिती – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई – राज्यात बी. ए. 4 आणि बी. ए. 5 या ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिंटचे रूग्ण आढळल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. यातील पहिल्या व्हेरिएंटचे 4 तर दुसऱ्याचे तीन रूग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हे सातही रूग्ण पुण्यातील आहेत. या सगळ्यांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

या सातही रूग्णांना सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार केले जात असल्याची माहितीही देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका आणि जगाच्या अन्य भागात हे व्हेरिएंट आढळून आले होते. मात्र महाराष्ट्रात प्रथमच त्याच्या रूग्णांची नोंद झाली आहे. नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या 7 जणांपैकी चार पुरूष आणि तीन महिला आहेत.

यातील चौघांचे वय 50 पेक्षा जास्त आहे, तर दोन जण 20 ते 40 वयोगटातील आहेत. सातवा रूग्ण एक 9 वर्षांचा मुलगा आहे. यातील सहा जणांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते, तर एका रूग्णाने बूस्टरही घेतला होता. सौम्य लक्षणे असणाऱ्या या सर्व रूग्णांवर त्यांच्या घरीच यशस्वी उपचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

4 ते 18 मे दरम्यान, या सगळ्यांचे नमूने घेण्यात आले होते. यातील दोघांनी दक्षिण आफ्रिका आणि बेल्जीयमचा प्रवास केला होता, तर अन्य दोघांनी केरळ आणि कर्नाटकला भेट दिली होती. इतर दोघांनी अलिकडच्या काळात कोठे प्रवास केला नव्हता.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar