Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कोरफड रस रसाहाराची आरोग्यदायी गुरुकिल्ली

by
May 31, 2023
in आहार
A A
कोरफड रस रसाहाराची आरोग्यदायी गुरुकिल्ली
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

त्वचेची काळजी घेणारी एक बहुगुणी, बहुउपयोगी अशी वनस्पती आयुर्वेदात आहे. जिचे नाव आहे कोरफड. कोरफडीचे औषधी गुण अनेक संशोधकांना पटले आहेत. आफ्रिका, आशिया, युरोप आणि अमेरिका या खंडांमधील कोरड्या प्रदेशात ही अतिगुणकारी वनस्पती वाढते. ख्रिस्तपूर्व 1500 सालातही कोरफडीचा वापर केला जात होता. इजिप्शियन लोक कोरफडीचा उल्लेख अमरत्वाची वनस्पती असा करीत असत. कोरफड हे क्‍लिओपात्राच्या सौंदर्याचे रहस्य होते, अशी एक दंतकथा आहे. बायबलमध्ये कोरफडीविषयी बरेच काही लिहिले गेले आहे. तारुण्य राखण्याचा कोरफडीत गुण आहे. कोरफड म्हणजे त्वचेची संजिवनी आहे.

कोरफड अनेक औषधांत व सौदर्यप्रसाधनात वापरतात. तसेच तिचा गर किंवा रसही खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
घटक ः तिच्यात 99 % ते 99.5 % पाण्याचा अंश, असून घन भागात 75 विविध घटकपदार्थ आहेत. जसे व्हिटामिन्स, मिनरल्स, एनझाइम्स, साखर, फिनॉलिक कंपाउंडस, लिगनिन, सॅपनिन्स, स्टिरॉल्स, अमिनो ऍसिडस आणि सॅलिक ऍसिड. कोरफडीच्या पानामध्ये 75 पेक्षाही अधिक जैविकदृष्ट्या कार्यरत असणारे घटक असतात.
कोरफडीच्या गरात व्हिटॅमिन “ड’ व “क’ सोडल्यास जवळजवळ सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स उपलब्ध आहेत, तर साखरेत मोनॉपॉली व म्यूकोपॉली सॅकरिज्स असे प्रकार उपलब्ध आहेत.

औषधी उपयोग ः सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण मिळू शकते. रक्‍त वाहताना थांबवणे किंवा जखमांवर उपयोग होतो. भाजलेल्या जखमांवर थंडावा देते. निद्रानाशावर डोक्‍यास जेल लावल्यास फायदा होतो. पोटात घेतल्यास आतड्यांची आतून स्वच्छता होते. लिगनिनमुळे त्वचेची स्वच्छता, डाग, पुटकुळ्या आणि सुरूकुत्यांवरही उपयोगी. ठराविक हवामानामुळे होणाऱ्या सर्दी खोकल्यासाठी हिचा नियमित पोटातून वापर चांगलाच असतो. कांतीचा रूक्षपणा, घट्टपणा, सैलपणा अर्थात थुलथुलीतपणा ह्यावर उपयोगी असते.
कोरफडीतील सॅपोनिन्समुळे बॅक्‍टेरिया, व्हायरस व बुरशीवर तीव्र परिणामकारक असल्याने कातडींच्या आजारावर – जसे एक्‍झिमा इ. किंवा जननेंद्रियांच्या कातडीवरील प्रादुर्भावावर उपयुक्त असते.

भाजणे, खरचटणे, कापणे, कीडा-मुंगी चावणे, जखमा आणि इतर काही गोष्टींमुळे त्वचेच्या टिश्‍यूवर जे परिणाम होतात त्यावर कोरफ ड हे हमखास गुणकारी आहे.
कोरफडीच्या पानाच्या आतील बाजूस असलेल्या अर्धपारदर्शक जेलमध्ये दाह प्रतिबंधक गुणधर्म असतात. त्वचेमधील बाधित टिश्‍यूवर उपचार करून नवीन टिश्‍यू निर्माण करण्याचे कार्य या जेलमध्ये आहे.
कोरफडीमुळे बाष्पीभवनाच्या नैसर्गिक प्रक्रियेला अटकाव होतो आणि त्यामुळे वातावरणातील ओलावा तिच्यात शोषला जातो.
कोरफडीमुळे त्वचेमध्ये ओलावा येतो. त्वचेच्या खराब झालेल्या टिश्‍यूवर उपचार होतो, त्याचप्रमाणे मरुम-पुटकुळ्या, काळी वर्तुळे, तांबडे चट्टे (रॅश), किरकोळ कापणे-भाजणे जखमा आणि ऍलर्जिक त्वचा विकासंमध्ये कोरफडीचा उपयोग होतो. कोरफड जेलमध्ये निरोगी त्वचेसाठी आवश्‍यक असे ई जीवनसत्त्व असते.

सेरिऑसिससारख्या त्वचेचे पापुद्रे काढणाऱ्या विकारावर कोरफड उपयुक्त आहे.
अशा या गुणकारी कोरफडीचा अनेक सौंदर्यप्रसाधने व औषधी बनवणारे व्यावसायिक नवनवीन उत्पादने घेऊन बाजारात येत आहेत.
आपल्या बागेतच किंवा घरातील कुंडीत ही जर कोरफड लावली तर डास, चिलिटे तर पळतीलच शिवाय कोरफडीच्या रूपाने एक औषधच घराच्या दारात हजर राहील.

असा करा कोरफडीचा रस :
कोरफडीचा रस तयार करत असताना कोरफडीची रूंद पसरट असलेली पाने घ्यावीत. ती किंचित गरम करून कापावीत व त्यातील गर काढावा. या गराचे कापलेले तुकडे स्वच्छ कापडात घेऊन पिळून रस काढावा व तो प्यावा. हा रस खालील व्याधीत उपयोगी पडतो.
यकृतविकार, अपचन, भूक कमी होणे, बद्धकोष्ठता, पित्त, कफ, व मुळव्याध, अपेक्षीत लाभ होतात हा रस घेणे बंद करावे.
पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे कोरफडीच्या चिकावर ताजेपणीच प्रक्रिया करून त्याचा रस किंवा गर काढून त्यावर प्रक्रिया करणं आवश्‍यक आहे. ह्यालाच जेल असे म्हणतात

गराचे चौकोनी तुकडे कापून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवूनही उपयोग होऊ शकतो.
अजून एक लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे या उत्पादनांमध्ये मुद्दाम लावलेल्या आणि काळजीपूर्वक मशागत केलेल्या उत्तम दर्जाच्या कोरफडीच्या पानांचाच समावेश हवा.

The post कोरफड रस रसाहाराची आरोग्यदायी गुरुकिल्ली appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar