Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘कॉम्प्युटरसे भी तेज दिमाग’ हवा असेल तर ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा !

by प्रभात वृत्तसेवा
September 27, 2021
in आरोग्य वार्ता
A A
‘कॉम्प्युटरसे भी तेज दिमाग’ हवा असेल तर ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आपल्या बालपणी आपण कॉमिक्स नक्कीच वाचले असतील. लोकप्रिय ‘चाचा चौधरी’ या कॉमिक्समधील त्यांच्या कुशाग्र आणि तल्लख बुद्धिमत्तेसाठी ‘कॉम्पुटर से भी तेज दिमाग’ असे वर्णन असायचे. प्रत्येकाचे स्वप्न असते की तल्लख बुद्धिमत्ता असावी. मुले हुशार व्हावीत यासाठी लहानपणापासून भिजवलेले बदाम मुलांना खायला दिले जातात, जेणेकरून त्यांचा मानसिक विकास जलद होईल आणि बुद्धी कुशाग्र होईल.

पण फक्त बदाम खाल्ल्याने बुद्धी वाढते का? उत्तर आहे – नाही ! मेंदूच्या पूर्ण विकासासाठी, अनेक पौष्टिक गोष्टींचा वापर आवश्यक आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, आपण ज्या प्रकारच्या आहाराचा वापर करतो त्याचा आपल्या मेंदूच्या संरचनेवर आणि आरोग्यावर विशेष परिणाम होतो. त्यामुळे लहानपणापासूनच त्या गोष्टींचा जास्त वापर केला पाहिजे ज्यामुळे मेंदूला पुरेसे पोषण मिळू शकते.

आरोग्य तज्ञांच्या मते, आपल्या मेंदूला चांगले काम करण्यासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. मेंदू एकटाच शरीराच्या 20 टक्के कॅलरीज वापरतो, त्यामुळे दिवसभर सक्रिय राहण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त आहार आवश्यक आहे. चला तर, आज जाणून घेऊया की मेंदू निरोगी आणि तीक्ष्ण ठेवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते?

* मेंदू निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा -3
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मेंदू कुशाग्र ठेवण्याबरोबरच पुरेशा पोषणासाठी ओमेगा -3 फॅटी ऍसिडची गरज असते. एका अभ्यासानुसार ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स न्यूरोडिजेनेरेटिव्ह रोगांचा धोका कमी करतात आणि मेंदूचे कार्य सुधारतात. मासे हे ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे चांगले स्त्रोत मानले जातात.

* अक्रोडचे सेवन फायदेशीर
अनेक अभ्यास असे सुचवतात की मेंदू निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत जास्त शेंगदाणे खावेत. याशिवाय अक्रोडचा वापर अधिक फायदेशीर मानला जातो. जर्नल न्यूट्रिएंट्स मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी अक्रोडचे सेवन सर्वात फायदेशीर ठरू शकते. स्मरणशक्ती सुधारण्याबरोबरच मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी अक्रोडचे सेवन फायदेशीर ठरू शकते. बुद्धी धारदार करण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

* डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे
डार्क चॉकलेट खाणे मेंदूच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर ठरू शकते. डार्क चॉकलेटमध्ये कोको असतो, ज्यामध्ये फ्लेवोनोइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. मेंदूच्या आरोग्यासाठी या अँटीऑक्सिडंटची विशेष भूमिका असते. एका रिपोर्टनुसार डार्क चॉकलेटचा वापर मेंदूला कुशाग्र करण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar