काही लोकांना ऊर्जेसाठी चहा किंवा कॉफीची गरज असते. सकाळी उठल्याबरोबर लोकांना कॉफीची गरज भासू लागते. दिवसभर ऑफिसमध्ये काम करताना किंवा रात्री उशिरापर्यंत जागे राहून लोक कॉफीचे सेवन करतात. एरवी आरोग्याला काहीशी हानिकारक मानली गेली असली तरी कॉफीचे अनेक फायदे आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे.
जगभरातील सुमारे 2.25 अब्ज लोक दररोज दोन कप कॉफी पितात. तथापि, काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की कॉफीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास अनेक गंभीर आजारांमध्ये फायदे मिळू शकतात. कॉफी अनेक रोगांचा धोका कमी करण्यासाठीदेखील फायदेशीर ठरू शकते.
कॉफीचे फायदे आणि हानी याबाबत अभ्यासात मिश्र परिणाम आढळले आहेत. निष्कर्ष असा आहे की योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी कॉफीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते आणि जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया आरोग्यासाठी कॉफीचे सेवन करण्याचे फायदे आणि तोटे.
कॉफीमध्ये आढळणारे पोषक द्रव्य…
कॉफीमध्ये अनेक पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी 2), नियासिन (व्हिटॅमिन बी 3), मॅग्नेशियम, पोटॅशियम, विविध फिनोलिक संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स कॉपीमध्ये असतात. तज्ञांच्या मते, या पोषक तत्त्वांचा मानवी शरीराला विविध प्रकारे फायदा होऊ शकतो.
टाईप-2 मधुमेहाचा धोका कमी
कॉफीच्या सेवनाने टाईप-2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. 2014 च्या अभ्यास अहवालानुसार, 48,000 हून अधिक लोकांवर संशोधन करण्यात आले आणि असे आढळून आले की जे चार वर्षांमध्ये दररोज किमान एक कप कॉफी पितात त्यांना टाईप 2 मधुमेहाचा धोका 11 टक्के कमी असतो. मात्र, मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कॉफीचे सेवन करावे.
चरबी कमी करण्यास मदत करते
कॅफीन चयापचय दर 3-11 टक्क्यांनी वाढवू शकते. म्हणूनच कॉफीला फॅट बर्निंग पूरक मानले जाऊ शकते. लठ्ठ लोकांची चरबी कमी करण्यासाठी कॅफिन उपयुक्त ठरू शकते.
यकृताच्या कर्करोगाचा धोका कमी असतो
कॉफीच्या सेवनाने यकृताच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. एका यूएस अभ्यासात असे दिसून आले आहे की जे सहभागी दररोज दोन ते तीन कप कॉफी पितात त्यांना हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा आणि दीर्घकालीन यकृत रोग होण्याचा धोका कमी होतो.
कॉफीमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो
कॉफीमध्ये आढळणारे कॅफीन रक्तदाबासह हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. एका अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की दररोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका 15 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
अशा प्रकारे एरवी आरोग्याला हानीकारक मानली जाणारी कॉफी आरोग्यदायीही ठरते आहे.
The post कॉफी पिण्याचे असेही फायदे appeared first on Dainik Prabhat.
