Saturday, August 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

केसांना तेल लावताना तुम्हीही या 9 चुका करता का? – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
October 29, 2021
in आरोग्य वार्ता
A A
केसांना तेल लावताना तुम्हीही या 9 चुका करता का? – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

केसगळती, डोक्यातील कोंडा, कमकुवत केसांची समस्या टाळण्यासाठी मुली तेल मालिशसह महागडी उत्पादने आणि उपचार घेतात. मात्र असे असूनही केसांचे तुटणे कमी होत नाही. याचे कारण तुमचे तेल लावण्याची चुकीची पद्धत असू शकते.  वास्तविक, मसाज करताना काही लोक अशा काही चुका करता, ज्यामुळे केस गळतात. तेलाची मालिश करताना कोणत्या चुका टाळाव्यात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही आठवड्यातून किती वेळा तेल लावता?

जर तुम्हाला वाटत असेल की 2 आठवड्यांत फक्त 1 हेअर ऑइल लावल्याने तुम्हाला फायदा होईल, तर तसे नाही. आठवड्यातून किमान 1-2 वेळा तेल लावा. यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढेल आणि केस मजबूत होतील.

तेल लावण्यापूर्वी केस विंचरू नका

बऱ्याचदा मुली तेल लावण्याआधी केस विंचरतात.  पण जर तुम्ही तेल मालिश केल्यानंतर केस विंचरलात तर तर कमी प्रमाणात गळतील. जेव्हाही तुम्ही तेल मसाज कराल तेव्हा केस आधीपासून मोकळे सोडा.

मसाज केल्यानंतर केस घट्ट बंधू नका

मसाज केल्यानंतर केस घट्ट बांधू नका. वास्तविक, मसाज केल्यानंतर टाळू मऊ होतो. अशा स्थितीत केस घट्ट बांधल्याने ते तुटू शकतात.

तेल लावल्यानंतर लगेच केस धुवू नका

बरेच लोक तेल लावल्यानंतर 10 मिनिटांनी केस धुतात. तथापि, पोषक घटकांना मुळांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान 1 तास लागतो. तेल लावल्यानंतर ते रात्रभर किंवा किमान 1-2 तास ठेवावे. जर तुम्ही लगेच तुमचे केस धुवाल, तर तेल मुळांपर्यंत पोहोचणार नाही.

बोटांनी तेल लावू नका

दर आठवड्याला आपल्या टाळू आणि केसांना तेलाने मसाज करणे खूप महत्वाचे आहे, मात्र बोटांनी जोरदार मालिश करणे अतिशय चुकीचे आहे. असे केल्याने केसांमध्ये गाठी तयार होतात आणि त्यामुळे ते खूप गळतात. एवढेच नाही तर मुळे कमकुवत होतात. त्याऐवजी, कापसाने तेल लावा आणि हलक्या हाताने गोलाकार हालचालीने मालिश करा.

जास्त तेल लावू नका

केसांना मसाज करण्यासाठी जास्त तेल लावू नका, पण थोड्या प्रमाणात तेल लावा. तसेच केसांवर नव्हे तर टाळूवर तेल मालिश करा.

अति गरम तेलाने मालिश करू नका

कोमट तेलाचा उपचार फायदेशीर आहे, परंतु अनेकजण तेल जास्त गरम करतात, ज्यामुळे त्याचे पोषक घटक संपतात. तेल कोमट होईपर्यंतच गरम करा आणि नंतर ते तुमच्या टाळूवर लावा, ज्यामुळे मुळांना पोषण मिळेल.

केसात दिवसभर तेल ठेवू नका

दिवसभर केसांमध्ये तेल ठेवणे ही सर्वात मोठी चूक आहे. यामुळे धूळ छिद्रांना चिकटते, त्यानंतर केसांच्या समस्या सुरू होतात. त्यामुळे केसांना दिवसभर तेलकट ठेवू नका.

टॉवेलने केस झाकून ठेवा

छान आणि सौम्य मालिश केल्यानंतर, केसांना उबदार टॉवेलने गुंडाळा, जेणेकरून तेल मुळापर्यंत पोहोचेल. नंतर 1 तासानंतर केसांनुसार नैसर्गिक किंवा हर्बल शैम्पूने धुवा.

जर तुम्ही तुमच्या केसांना नियमितपणे तेल लावत असाल तर तुम्ही या चुका तर करत नाही ना याची खात्री करा.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar