कोरफड अग्निदीपक आहे. भूक लागत नसल्यास कोरफडीचा रस पोटात घ्यावा. हिची रुंद पाने घेऊन किंचित विस्तावर शेकावी. नंतर ती पाने सोलून आतील गर काढावा व एका फडक्यात धरून घट्ट पिळावा. अशा रीतीने काढलेला रस सुमारे 5 मि. ली. (म्हणजे अंदाजे बोंडलेभर) घेऊन त्यात संध्येच्या पळीभर मध घलावा व रोज सकाळी घ्यावा, शौचास चांगले साफ होते, उत्तम भूक लागते. असा हिचा रस चाळीस दिवस जाणत्या माणसाने घेतल्यास अग्निमांघ व त्यापासून आलेली क्षीणता दूर होते. कोरफड पित्तशामक आहे.
पित्तकर प्रकृतीच्या माणसांनी, वरीलप्रमाणे काढलेला रस 3 मि. ली. (म्हणजे लहान दोन चमचे) घेऊन कमी होते. कोरफड कफ नाहीसा करणारी आहे. लहान मुलांस कफ झाला असता हिचे पान विस्तवावर थोडे भाजून रस काढावा व तो रस संध्येच्या पळीभर घेऊन त्यात मिठाचे दोन दाणे घालून लहान मुलास द्यावा. दोन चार वेळा देताच मुलास परसाकडे साफ होते व कफ नाहिसा होतो.
कोरफड श्वासघ्न आहे. श्वास (म्हणजे दमा) मग तो लहान मुलास अगर म्हताऱ्यास होवो, ह्याच्या सेवनाने कमी होतो. हिचा रस दोन तासांनी संध्येच्या पळीभर, थेंबभर तूप व थेंबभर मध घालून दिल्याने लहान मुलांचा कसलाही दमा नाहिसा होतो. उडते(दम श्वास) थांबते. कोरफड बलवर्धक आहे. हिचा रस नित्य 6 ग्रॅम, साखर टाकून घेतल्याने लवकरच भूक लागून शक्ती वाढू लागते. कोरफड ज्वरघ्न आहे. मोठा ताप येत असल्यास, दिवसातून तीन वेळ सकाळ, दुपार संध्याकाळ हा रस 10 मि.ली.पाच मिऱ्याचे दाणे बारीक करून ती पूड आत टाकून घ्यावा. कसल्याही प्रकारचा ताप 2-3 दिवसात बरा होतो.
बारीक ताप येत असल्यास सकाळी व संध्याकाळी अशा वेळेला हा रस 5 मि.ली. अर्धा ग्रॅम, पिंपळी व 3 ग्रॅम मध घालून घ्यावा. एका सप्तकात जीर्णज्वर म्हणजे नित्य नेमाने येणारा बारीक ताप कमी होतो. शौचास साफ होऊन भूक चांगली लागू लागते. अंगात हुषारी येते. शक्ती हळूहळू वाढते. यकृत (म्हणजे पोटात उजव्या बाजूचे बरगड्याचे खाली असलेली ग्रंथी) वाढले असेल तर कोरफडीसारखे दुसरे औषध नाही. हिचा रस 5 मि.ली, त्यात वयाप्रमाणे 1 ग्रॅमपासून 3 ग्रॅमपर्यंत नवसस्रर, उडवलेला अगर साधा टाकून घ्यावा, थोडेच दिवसात बरे होते, प्लीहा (डावे बाजूस बरगडीखाली असलेली ग्रंथी) मोठी झाली असेल तर कोरफडीचा रस 6 मि.ली. आत पाव ग्रॅम मीठ घालून सांज-सकाळ द्यावा, प्लीहा कमी होते. प्लीहेपासून जर ताप येत असेल, तर तोही जातो. उदरासंबंधी कोणताही रोग झाला असता हे एक वस्ताद औषध आहे.
सुमारे 50 ग्रॅम कोरफडीचा रस, त्यात 3 ग्रॅम मीठ घालून तो रस एका कल्हईच्या भांड्यात घालून मंदाग्नीवर ठेवावा. त्यास एक कढ येताच ते मिश्रण खाली उतरून गाळून घ्यावे. त्यात 5 ग्रॅम जुना गूळ घालून तयार झालेले मिश्रण रोज घ्यावे. सर्व एकदम घेतल्यास बरे. एकदम न घेववेल तर दोन वेळा मिळून घ्यावे. ह्याचे योगाने कसलेही आणि केवढेही वाढलेले उदर असो, दोन चार वेळ खळखळून जुलाब होऊन कमी होते. हे औषध चालू असता भाजलेल्या तांदुळात घासभर भात वरणाचे पाण्याशी खवा. दुसरे काही खाऊ नये.
हे औषध वैद्याचे सल्ल्याने करावे. कोरफड रक्तशुद्धी करणारे आहे. कोणत्याही कारणाने शरीरातील रक्त बिघडलेले असेल तर किंवा दूषित झालेले असेल तर कोरफडीचा रस खडीसाखर घालून 6-6ग्रॅम सकाळ संण्याकाळ झयावा. रक्तदोष कमी होतो. शरीरातील रक्त तापून कोणत्याही एका भागात जास्त जाऊन त्यापासून ग्रंथी अथवा गुल्म झालेला असेल तर कोरफडीचा रस तो नाहिसा करतो.
10 ग्रॅम मंजिष्ट ठेचून 100 मि.ली. पाणी घालून त्याचा अष्टमांश काढा करावा. त्यात 1. ग्रॅम कोरफडीचा रस, 1/2 ग्रॅम हळद घालून नित्य नेमाने रोज सकाळी घेत गेल्याने 2-3 सप्तकात, कोणत्याही कारणाने शरीरात झालेली ग्रंथी बरी होते.
रक्तपित्त म्हणजे नाकातून घोणा फुटून रक्त पडणे अथवा शौचाचे वाटेने रक्त पडणे तसेच त्वचेचे सगळे रोग होणे, अंगाला कंड सुटणे, पुळ्या येणे, खरूज येणे शरीरावर मोठमोठे फोड येणे इत्यादी रक्तविकारही कोरफड, मंजिष्ट व हळद यांचे औषध वरीलप्रमाणे काढा करून घेतल्याने सर्व विकार नाहीसे होतात. हिचा वरूनही (पोटात न घेता) उपयोग होतो. शरीर कोठेही भाजले असेल तर कोरफडीची पाने नीट सोलून आतील गर काढून भाजलेल्या जागी ठेवावा. गार वाटून दाह ताबडतोब शमन होतो. ढोळे आले असल्यास हिचा 10 ग्रॅम गर घेऊन त्यात 2 ग्रॅम तुरटीची लाही टाकून 1/4 अफू मिळवावी. याने डोळ्यातील रक्त फाकून आग शमते व डोळ्यांची लाली कमी होऊन आलेले डोळे लवकर बरे होतात.