नवी दिल्ली – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार कमी झाला आहे. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. लहान मुलांना करोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक इंफोग्राफिक शेयर केले आहे.
डॉ. हर्ष वर्धन यांनी मुलांना करोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी इंफोग्राफिक मार्फत काही टिप्स दिल्या आहेत. यामध्ये करोनाच्या सुरवातीच्या लक्षणापासून ते करोना झाल्यास त्यावरील उपायासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
लहान मुलांमध्ये करोनाची लक्षणे
1 तीव्र ताप
2 दम लागणे
3 उलट्या आणि पोटात वेदना
4 कोरडा खोकला
5 शरीरात वेदना
6 डोकेदुखी
7 वास आणि चव कमी होणे
वरीलपैकी लक्षणे दिसल्यास त्वरील डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा सल्ला डॉ. हर्ष वर्धन यांनी दिला आहे. लहान बालकांना करोनाचे संक्रमण होने ही एक चिंताजनक बाब आहे. यापासून वाचण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शकसुचनांचे अनुसरण करणे महत्वाचे आहे.
लहान मुलांना करोना व्हायरस पासून वाचण्यासाठी टिप्स
1 मुलांना घराबाहेर पडू देऊ नका
2 नियमीत मास्कचा वापर
3 वारंवांर स्वच्छ हात धुण्यास सांगणे
4 बाहेरून आल्यावर अंघोळ करणे
5 अंघोळ शक्य नसल्यास हात-पाय स्वच्छ धुणे, कपडे बदलून घेणे
यावेळेस करोना व्हायरस फुफ्फुसांवर हमला करत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने आपल्या सुचनांमध्ये सांगितले आहे. त्यामुळे फुफ्फुसं खराब होत असून श्वास घेण्यास त्रास होताना दिसून येत आहे. हेल्थ एक्सपर्टकडून मुलांना करोना संक्रमणांपासून वाचविण्यासाठी नियमीय व्यायम करण्याचे महत्वाचे आहे. ज्यामुळे फुफ्फुसाची ताकद वाढण्यास मदत होणार.
डॉ हर्ष वर्धन यांनी इंस्टाग्रामवर हे पोस्ट शेअर करत देशवासियांना सतर्क केले आहे. करोना विषाणूचा धोका मुलांमध्ये खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे ही माहिती खूप उपयुक्त आहे.