Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

किडनी स्टोन ते मधुमेहापर्यंत, जाणून घ्या “कुळीथ’ डाळीचे आश्चर्यकारक फायदे! – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
April 23, 2022
in आरोग्य वार्ता
A A
किडनी स्टोन ते मधुमेहापर्यंत, जाणून घ्या “कुळीथ’ डाळीचे आश्चर्यकारक फायदे! – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

Benefits Of Kulith Dal: कडधान्ये आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. शरीरातील प्रथिने आणि पोषक तत्वांची कमतरता डाळींच्या सेवनाने पूर्ण होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका डाळीबद्दल सांगत आहोत, ज्याचा आहारात समावेश करून तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्या टाळू शकता. तुमच्या किडनीमध्ये जर वारंवार स्टोन बनत असेल, तर कुळीथ डाळ (Kulith Dal) तुमच्यासाठी वरदान ठरेल. त्याचबरोबर लठ्ठपणा किंवा मधुमेहासारख्या आजारांनी घेरले असले तरी ही डाळी खूप उपयुक्त आहे. इतर अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही कुळीथ डाळ (Kulith Dal) अतिशय गुणकारी आहे.

कुळीथ डाळ (Kulith Dal) हे घोड्याचे खाद्य म्हणूनही ओळखले जाते. सर्व डाळींपेक्षा या डाळीत सर्वाधिक प्रथिने असतात. याला पहाडी डाळ असेही म्हणतात. कुळीथ हे मांसापेक्षाही पौष्टिक आहे आणि शरीराला उबदार ठेवण्यासाठी देखील प्रभावी आहे. म्हणूनच याचा वापर हिवाळ्यात जास्त केला जातो. पण जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर तुम्ही कोणत्याही ऋतूत ते खाऊ शकता.

कुळीथ डाळ (Kulith Dal) गडद तपकिरी रंगाची असून मसूराच्या डाळीसारखी दिसते. देशातील प्रत्येक राज्यात याची लागवड केली जाते, त्यामुळे ते सर्वत्र सहज उपलब्ध होते. अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्यासाठी कुळीथ उपयुक्त आहे.

जाणून घ्या कुळीथ डाळ खाण्याचे ‘हे’ फायदे –

१. मधुमेह (Diabetes) नियंत्रणात राहते
उच्च प्रथिनयुक्त आहार घेणे मधुमेहामध्ये फायदेशीर आहे. मधुमेहामध्ये कुळीथ डाळ खाण्याचे दोन फायदे आहेत. प्रथम, हा उच्च प्रथिनयुक्त आहार आहे आणि त्यात साखर नियंत्रणात ठेवण्याचा गुणधर्म देखील आहे.

२. वजन कमी (Weight loss) करण्यात प्रभावी
तुमचे वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरणारा आहार तुम्ही शोधत असाल, तर तुम्हाला कुळीथाच्या डाळीपेक्षा चांगला पर्याय सापडणार नाही. प्रथिनांसह सर्वकाही कुळीथ डाळीमध्ये आढळते. तसेच यामुळे पोट जास्त काळ भरल्यासारखे वाटते.

ही बातमी वाचा : किडनीचे आजार होऊ शकतात घातक, ‘या’ चार गोष्टी लक्षात घ्या आणि किडनी निरोगी ठेवा

३. हृदयासाठी फायदेशीर
कुळीथ डाळीचे नियमित सेवन केल्याने हृदयाशी संबंधित समस्या दूर होऊन हृदय निरोगी राहण्यास मदत होते. कुळीथ डाळीमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

४. कोलेस्टेरॉलचा (Cholesterol) धोका कमी होतो
कुळीथ डाळ LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून HDL म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करते. यामुळे शरीरात जमा होणारे कोलेस्ट्रॉल कमी होते.

५. रोग प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवणाऱ्या डाळी
जर तुम्हाला वारंवार सर्दी किंवा ऍलर्जी होत असेल तर तुम्ही नक्कीच कुळीथ डाळीचे सेवन करा. कुळीथ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

६. बद्धकोष्ठता (Constipation) दूर करते
कुळीथाच्या डाळीमध्ये भरपूर फायबर असल्याने ते आतडे स्वच्छ ठेवण्यास तसेच बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar