Short Family Effects – 2095 पर्यंत जगभरात कुटुंबे आणखी आक्रसून जातील. सख्ख्या आणि चुलत भावंडांसोबत बालपण घालवणारे खेळणारे दंगामस्ती करणारी ही शेवटची पिढी ठरेल. आताच्या पिढीत एखादे दुसरेच आपत्य असते आणि त्याची चुलत भावंडे असली तर ती कधीतरी वर्षातून एखाद्या दिवशी एकत्र येतात. बाकी सगळे फोन आणि सोशल मीडिया वरूनच चालू असते. पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती, नातेवाईक, गोतावळा या संकल्पना गेल्या दशकामध्ये कमी होत गेल्या. कुटुंबे लहान आणि आणखी लहान होत गेली. (After a few years, there won’t even be cousins…)
जर्मनीतील मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूट फॉर डेमोग्राफिक रिसर्चने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे, की आता जगभरात एका कुटुंबाच्या नातेवाईकांच्या संख्येमध्ये 35 टक्क्यांनी घट झालेली आहे. या अभ्यासकांनी युनायटेड नेशन्स 2022 च्या रिविजन ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स या अभ्यासातून ही आकडेवारी प्राप्त केलेली आहे.
जर्मनीतील डायवेल्ट या संस्थेच्या सांगण्यानुसार हा अहवाल वापरून गणितीय मॉडेल्स तयार करण्यात आली आणि त्यातून कुटुंबांच्या नात्यांचा शोध घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक देशातील 1000 नात्यांचा नकाशा तयार करून त्याचा वापर मॉडेल म्हणून करण्यात आला. त्यानुसार 65 वर्षाच्या महिलेला सरासरी 41 जिवंत नातेवाईक 1950 मध्ये असायचे. 2095 मध्ये याच वयाच्या महिलेला केवळ 25 जिवंत नातेवाईक असतील अशी परिस्थिती उद्भवणार आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे, की कुटुंबे आक्रसत आहेत. त्याचबरोबर 2095 पर्यंत कुटुंबांची रचना देखील पूर्णपणे वेगळी असेल.
सध्या कुटुंबाचा वृक्ष काढला, तर त्यामध्ये आजी-आजोबा त्यानंतर त्यांच्या शाखा, त्यांची मुले अनेक चुलत भावंडे, नातवंडे, नाती असा सगळा गोतावळा असतो. त्यातून असे दिसते की सध्या कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिकांपेक्षा मुलांची आणि तरुणांची संख्या लक्षणीय आहे. त्यामध्ये भविष्यात फेरसंतुलन होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय संशोधनाचा निष्कर्ष असा आहे, की भविष्यातील कुटुंबांमध्ये पणजोबा आणि आणि त्यामुळे कुटुंबाचा आकार वृक्ष आणि त्याच्या फांद्या अशा स्वरूपापेक्षा तो नारळाच्या वृक्षाप्रमाणे सरळसोट एकाच खोडावर असेल.
पृथ्वीच्या पाठीवरील एका भागात अशी वेगळी वस्तुस्थिती निर्माण झालेली असेल तर दुसऱ्या काही भागांमध्ये अतिशय टोकाची किंवा काही वेळा अस्तित्वाच्या बदलाची परिस्थिती निर्माण झालेली असेल. सायंटिफिक अमेरिकन या संस्थेच्या मते, रक्ताच्या नात्यापेक्षाही अन्य मित्र-मैत्रिणी, परिचित अशा वाढीव नात्यांचे बंध आणि त्या द्वारे जोडलेली माणसे एखाद्या व्यक्तीची अधिक काळजी घेत असतील. आजी-आजोबा, आत्या, काका हे मुलांची काळजी घेतील. त्या बदल्यात चुलत भावंडे मोठी झाल्यावर त्यांच्या आजी-आजोबांची, चुलत आजोबांची, आत्यांची जबाबदारी शेअर करतील.
सगळ्यात मोठा बदल म्हणजे नातेवाईकांची संख्या कमी होत जाईल. त्यामध्ये चुलत भावंडांचे अस्तित्वच जवळपास संपून जाईल आणि त्यायोगे पुतण्या, पुतणी आणि चुलत नातवंडे ही संकल्पनाच संपून जाण्याची चिन्हे आहेत. त्याचवेळी सीबीसीने केलेल्या विश्लेषणात तज्ञांच्या मते चुलत भावंडे आणि त्यांचे कुटुंब हा अनेकदा पाठबळासाठी अतिशय महत्त्वाचा स्त्रोत असतो. विशेषतः अस्वस्थ आणि एकाकी असलेल्या व्यक्तींसाठी त्यांचे पाठबळ महत्त्वाचे ठरते.
1950 मध्ये दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियन बेटांच्या परिसरात सरासरी 65 वय असलेल्या महिलेला जिवंत असणारे ५६ नातेवाईक असायचे परंतु 2095 मध्ये 65 वर्षाच्या महिलेला केवळ 18.3 जिवंत नातेवाईक असतील. म्हणजे नातेवाईकांच्या संख्येत तब्बल 67 टक्क्यांनी घट झालेली असेल. युरोप आणि उत्तर अमेरिकेत हीच घट 15.9% एवढी असेल म्हणजेच सध्या त्या ठिकाणी 65 वर्षाच्या महिलेला 25 नातेवाईक असतात त्यामध्ये 15.9% नी घट होईल.
The post काही वर्षांनी चुलत भावंडे देखील नसणार…! appeared first on Dainik Prabhat.