मुंबई -राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता. परंतु आता राज्यातील उकाडा पुन्हा वाढणार आहे. राज्यातील तापमान 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच पुढील दोन दिवसात कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही भागांत उष्माघातात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ठिकाणांमध्ये फेब्रुवारी महिन्यातच तापमानात प्रचंड वाढ झाली होती. अंगाची लाहीलाही होत असतानाच 5 ते 8 मार्च दरम्यान राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा
दिला. त्यामुळे हवेत गारवा होता.
पुणे,मुंबई सारख्या शहरांमध्ये सध्या साथीचे आजार वाढू ;लागले आहेत. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासोबतच आगामी काळात पार वाढणार असल्यामुळे पाणी पिण्यापासून ते रोजच्या जेवनपर्यंतच्या सर्वच गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
The post काळजी घ्या ! लहान मुलांचे आरोग्य सांभाळा.. राज्यातील उकाडा पुन्हा वाढणार appeared first on Dainik Prabhat.