Thursday, May 22, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

काय सांगता ! संस्कृत बोलणाऱ्या ‘या’ गावात प्रत्येक घरात आहे इंजिनियर; मुस्लिम बांधवही बोलतात संस्कृत

by
December 15, 2022
in लाईफस्टाईल
A A
काय सांगता ! संस्कृत बोलणाऱ्या ‘या’ गावात प्रत्येक घरात आहे इंजिनियर; मुस्लिम बांधवही बोलतात संस्कृत
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

बंगळुरु : संस्कृत भाषेला राष्ट्र भाषेचा दर्जा द्यावा आणि त्या भाषेतून व्यवहार करणे सक्तीचे करावे अशा आशयाची मागणी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली. ही मागणी केली जात असतानाच कर्नाटकात मात्र असे एक गाव आहे ज्या गावामध्ये फक्त संस्कृत भाषाच बोलली जाते. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील मतरू नावाचे हे गाव संस्कृत भाषा बोलणाऱ्यांसाठीच प्रसिद्ध आहे.

या गावांमधील सर्व व्यवहार संस्कृत या बोली भाषेतच केले जातात बाहेरून कोणी नागरिक आला तरी त्याच्याशी संस्कृतमध्येच बोलले जाते. गावातील मुस्लिम नागरिकही संस्कृत भाषेतूनच व्यवहार करतात या गावांमध्ये बोली भाषेसाठी संस्कृतचा वापर केला जात असला तरी व्यवहार्य भाषा म्हणून मात्र राज्यभाषा असलेल्या कन्नड भाषेचा वापर केला जातो. त्यामुळे या गावात असलेली ग्रामपंचायत कार्यालय असो किंवा इतर सरकारी कार्यालय असोत त्यामध्ये बोलताना नागरिक जरी संस्कृत भाषेचा वापर करत असले तरी व्यवहार करताना मात्र कन्नड भाषेचाच वापर केला जातो.

इतर भाषांचे या गावाला वावडे नाही प्रत्येक घरामध्ये एक इंजिनियर असून तो अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये नोकरीला आहे. या व्यतिरिक्त या गावांमध्ये 30 प्रोफेसर असून ते संस्कृत आणि इतर भाषा शिकवण्याचे काम करतात 4 हजार लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये लहान मुले असो किंवा वयोवृद्ध नागरिक असो सर्वच लोक संस्कृत भाषेमध्ये एकमेकांशी बोलत असतात या गावांमध्ये एकही दारूचे दुकान नाही किंवा मटणाची दुकाने नाहीत. हे गाव सुपारीच्या शेतीसाठी प्रसिद्ध असून त्यामुळे ते समृद्ध आणि संपन्न आहे.

संस्कृत भाषेची परंपरा या गावात जपण्यात आली असली तरी गावात इतर सोयीसुविधाही आहेत गावांमध्ये आलिशान बंगले आहेत. बंगल्याबाहेर मोटारी उभ्या आहेत. याशिवाय वायफाय आणि इंटरनेट या सुविधांचा वापरही केला जात आहे. गावतील भिंतीवर ज्या काही घोषणा लिहिल्या जातात त्या सुद्धा संस्कृत मध्ये असून कार्यालयांमधील नेमप्लेट सुद्धा संस्कृतमधूनच आहेत गावात बोलली जाणारी मूळ भाषा संकेती नावाने ओळखली जात होती ही भाषा संस्कृत आणि तमिळ भाषांचे मिश्रण होते त्यानंतर या गावाने संस्कृत या भाषेचाच स्वीकार केला

The post काय सांगता ! संस्कृत बोलणाऱ्या ‘या’ गावात प्रत्येक घरात आहे इंजिनियर; मुस्लिम बांधवही बोलतात संस्कृत appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar