Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

काय सांगता ! मनसोक्त नाचल्यामुळे मनावरचा ताण होतो कमी

by प्रभात वृत्तसेवा
July 7, 2022
in लाईफस्टाईल
A A
काय सांगता ! मनसोक्त नाचल्यामुळे मनावरचा ताण होतो कमी
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मनसोक्त नाचल्यामुळे मनावरचा ताणही कमी होतो शिवाय मनही सदैव आनंदी राहायला मदत होते. सध्या त्यामुळे अनेकजण डान्सचे वेगवेगळे फॉर्म शिकताना दिसतात. अनेकजण डान्सकडे स्वतःला शोधण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्वात सकारात्मकता येण्यासाठी गांभीर्याने पाहू लागले आहेत.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपला जास्तीत जास्त वेळ लोक सोशल मीडिया, व्हिडीओ गेम यांच्यामध्येच वाया घालवतात, पण एखादा डान्स फॉर्म जर तुम्ही शिकलात तर निरोगी राहायला तर मदत होतेच शिवाय आत्मविश्‍वास वाढतो, लक्ष केंद्रित करायला मदत होते, एकाग्रता, टीम म्हणून काम करणे, शिस्त, शरीराची रचना या प्रत्येक गोष्टी सुधारण्यास मदत होते. डान्स शिकताना निसर्गाशी एकरूप होता येते, ज्यामुळे मनही प्रसन्न राहायला मदत होते. योग्य पद्धतीने रक्ताभिसरण होते. तसेच मांसपेशी मजबूत होतात आणि वजन नियंत्रित राखण्यास मदत होते.

त्याचबरोबर चांगलं संभाषण आणि कौशल्य विकसित व्हायला मदत होते. शरीरातील घाम नृत्यामुळे बाहेर पडायला मदत होते त्यामुळे एण्डॉर्फिन हा घटक शरीरातून बाहेर पडायला मदत होते. याचा फायदा आनंदी राहाण्यास होतो.

मन प्रसन्न राहायला चांगल्या संगीतामुळेही मदत होते. त्यामुळे संगीत आणि डान्स यांची सांगड घालून तुम्ही डान्सचे क्षण अक्षरशः जगू शकतात. संपूर्ण फिटनेस, सहनशक्ती आणि स्नायूंना बळकट करण्याचे काम डान्स करते. तसेच ग्रुपमध्ये एकत्रितपणे काम केल्याने टीमचे महत्त्व तसेच टीम बॉण्डिंग वाढायला मदत होते. भरपूर सहनशक्ती नृत्यासाठी आवश्‍यक असते जी शरीर चपळ करण्यास मदत करते. अशा प्रकारे डान्समधून मनःशांती, एकाग्रता, चपळता, तंदुरुस्ती आणि निरोगी राहण्यास मदत होते.

=================

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar