पुणे – सांबर चवदार बनवायचं असल्यास त्यामध्ये शेवग्याचा वापर केला जातो. परंतु हाच शेवगा आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. थकवा अशक्तपणा, मधुमेह अश्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी शेवगा हे अतिशय उपयुक्त ठरत आहे. शेवग्याला इंग्रजीत ‘ड्रमस्टिक’ म्हणतात. आयुर्वेदात याला ‘अमृत’ म्हणून ओळखले जाते.
झाडाच्या मुळापासून ते फळापर्यंत तसेच त्याच्या वाळलेल्या झाडाची पाने सुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शेवग्यामध्ये पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस आणि जस्त यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
तसेच अँटीफंगल, अँटीव्हायरल, अँटी-डिप्रेसंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी चे गुणधर्म असतात, जे एखाद्या व्यक्तीला तंदुरुस्त ठेवण्यासाठीच नव्हे तर त्याच्या विकासात देखील मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया की, शेवग्याचे सेवन केल्याने कोणते आरोग्य फायदे होतात.
वजन कमी होणे..
जर तुम्ही तुमच्या वाढत्या वजनाने हैराण झाले असाल आणि तुमचा लठ्ठपणा लवकर कमी करायचा असेल तर तुम्ही शेवग्याच्या पानांचा वापर करू शकता. यामध्ये असलेले क्लोरोजेनिक अॅसिड आणि लठ्ठपणाविरोधी गुणधर्म वाढलेले वजन कमी करण्यास मदत करतात.
मधुमेहावर नियंत्रण ठेवते..
डायबिटीजमध्येही शेवगा खूप फायदेशीर मानला जातो. शेवग्याच्या बिया, साल आणि पानांमध्ये मधुमेह-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.
प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते…
शेवग्याच्या पानांमध्ये असलेले पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करते.
सूज कमी करण्यास मदत करते…
शेवग्यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म सूज कमी करण्यास मदत करतात. संधिवातांसह अनेक स्वयंप्रतिकार रोगांमुळे जळजळ वाढत राहते. याशिवाय दुखापत किंवा संसर्ग झाल्यानंतरही शरीरात सूज वाढते. अश्यातच शेवग्याचे सेवन केल्याने तुम्हाला सूज येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
The post काय सांगता.! मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी वरदान आहे ‘शेवगा’; जाणून घ्या खास माहिती…. appeared first on Dainik Prabhat.