Monday, July 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

काय सांगता तुमच्या किचन अन् फ्रिजमधूनही पसरतो ब्लॅक फंगस?; जाणून घ्या डॉक्टर्स मत

by प्रभात वृत्तसेवा
May 28, 2021
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलं आहे. त्यातच करोनासोबत आता ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगस आजार करोनामुक्त झालेल्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे चिंतेच वातावरण आहे.

म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसबद्दल सोशल मीडियावर विविध प्रकारची माहिती शेअर केली जात आहे.  या माहितीमध्ये  ब्लॅक फंगस कसा पसरतो ? त्याच्यापासून बचाव करण्यासाठीचे उपाय काय  ?  कांद्यांवर दिसणारा काळा थर आणि फ्रिजमध्ये दिसणारा काळा थर ब्लॅक फंगस असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे.  हा दावा खरा की खोटा असा प्रश्न आता चर्चेत आला आहे. याबाबत आता ‘एम्स’चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. 

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं की, कमी प्रतिकारशक्ती असणाऱ्यांनाच म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस, कँडिडा आणि एस्पोरेजनसची लागण होते. तसेच ब्लॅक फंगस हा आजार संसर्गजन्य नाही. प्रतिकारशक्ती कमी हेच ब्लॅक फंगस होण्यासाठीच एकमेव कारण असल्याचे डॉ. गुलेरिया यांनी नमूद केलं. 

तसेच म्युकरमायकोसिस  ब्लॅक फंगस नाही आणि ब्लॅक फंगसचं नावच मुळात चुकीचं आहे. कारण ब्लॅक फंगस काळ्या रंगाची नसते.. ब्लॅक फंगसची लागण झाल्यावर शरीरातील रक्तपुरवठा थांबतो. त्यामुळे त्वचेवर काळ्या रंगाचे डाग येतात. त्यामुळे याला ब्लॅक फंगस म्हटलं जात असावं. याचं खरं नाव म्युकरमायकोसिस  आहे. 

दरम्यान, ब्लॅक फंगस आजार सायनस, राईनो ऑर्बिटल आणि मेदूवर आघात करतो. आता छोट्या आतड्यातही ब्लॅक फंगस दिसून आला आहे. मात्र वेगवेगळ्या रंगांनी या आजाराला ओळखणे चुकीचं असल्याचं डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

ब्लॅक फंगस आजार एकमेकांना स्पर्श केल्याने पसरत नाही. मात्र स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करायला हवं. गरम पाणी प्या. नाकात त्रास, गळा खवखवणे, चेहऱ्यावरील संवेदना कमी होणे, पोटदुखी, ब्लॅक फंगसची लक्षण आहेत. ब्लॅक फंगसच्या रंगापेक्षा लक्षणांवर लक्ष द्यावे, जेणेकरून उपचार लवकर झाला तर बचाव होतो, अशा सूचनाही डॉ. गुलेरिया यांनी केल्या.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar