Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

काय सांगता ! आता वरण-भातही महागणार.. डाळींच्या दरामध्ये झपाट्याने होत आहे वाढ

by
May 23, 2023
in आहार
A A
काय सांगता ! आता वरण-भातही महागणार.. डाळींच्या दरामध्ये झपाट्याने होत आहे वाढ
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई – डाळ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक भारतीयांच्या घरामध्ये दररोज शिजवली जाते. परंतु सध्या डाळींच्या वाढत्या किंमती पाहता लवकरच ही डाळ स्वयंपाक घरातून गायब तर होणार नाही ना अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्यापर्यंत डाळींच्या किमतींवर सरकारने नियंत्रण ठेवले होते. परंतु आता मे महिन्यामध्ये डाळींच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे.

कंज्युमर अफेयर विभागाची आकडेवारी नक्कीच सर्वांना धक्का देणारी आहे. जर अशीच या आकडेवारींमध्ये वाढ होत गेली तर स्वयंपाक घरातून डाळ नक्कीच गायब होईल अथवा ती जनसामान्यांच्या आटोक्‍याबाहेर जाईल हे नक्की.

कंज्युमर अफेयर विभागाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यामध्ये तुरीच्या डाळींची सरासरी किंमत 116.68 रुपये होती. परंतु आता 18 मे रोजी समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही किंमत वाढून 118.98 रुपये इतकी झाली असून मे महिन्याच्या अखेरीस या किंमती 120 रुपयाचा टप्पा पार करणार असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास मध्यमवर्गीय लोकांना याचा सर्वात जास्त फटका बसणार आहे.

मे महिन्यात फक्त तूरीच्या डाळींच्या किंमतीत वाढ झाली नाही, तर मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ आणि चन्याच्या डाळींच्या किंमती देखील वाढल्या आहेत. मूग डाळींच्या किमतींविषयी सांगायचे झाल्यास 18 मे दरम्यान डाळींच्या किंमतींमध्ये 107.29 रुपयांवरून 108.41 रुपयांची वाढ झाली आहे. तर उडीद डाळींच्या किंमतीत 108.23 रुपयांवरून 109.44, तर चन्याच्या डाळींच्या किंमतीत 73.71 रुपयांवरून 74.23 रुपयांची वाढ झाली आहे.

सरकारची भूमिका काय ?
डाळींच्या वाढत्या किंमतींमुळे सरकार देखील चिंतेत आहे. त्यामुळे डाळींच्या वाढत्या किंमती पाहता केंद्र सरकारकडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, कोणीही एका महिन्यापेक्षा जास्त काळ डाळींचा साठा करुन ठेवू शकत नाही. जर कोणी असे केले तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच डाळींच्या आयातीवर देखील कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. खरेतर भारतात 70 टक्के तूरडाळ आयात केली जाते.

The post काय सांगता ! आता वरण-भातही महागणार.. डाळींच्या दरामध्ये झपाट्याने होत आहे वाढ appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar