नवी दिल्ली : तणाव हे तुमचे वजन वाढण्याचे मुख्य कारण बनू शकते, असे कुणी म्हटल्यास तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र हे एका अभ्यासानंतर स्पष्ट झाले असल्यामुळे वाढते स्ट्रेस किंवा तणाव मानसिकच नव्हे तर शारीरिकदृष्ट्या देखील घातक ठरू शकते.
जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा शरीरातील कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे तुमच्या रक्तातला ग्लुकोज बाहेर पडतो. यामुळे तुमचे वजन वाढते. तणावामुळे तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, ज्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. तसेच तणावामुळे तुम्हाला सतत खूप भूक देखील लागते. तणावाच्या दरम्यान, तुमच्या वर्तनात अनेक मोठे बदल होतात जे तुमच्या वजनावर परिणाम करू लागतात. चला तर, स्ट्रेसमुळे वजन कसे वाढते यामागील कारणे जाणून घेऊया.
* जंक फूड – तणावामुळे आपण आपल्या डोळ्यांसमोर जे खाद्यपदार्थ दिसतील काही आहे ते खातो. विशेषतः आपल्याला अशा गोष्टी खायला आवडतात जी सहज उपलब्ध होतात तसेच जे बनवण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही. फास्ट फूड हा आपला आवडता आहार बनतो, ज्यामुळे वजन वेगाने वाढू लागते.
* सुस्ती वाढणे – कोर्टिसोलच्या पातळीत वाढ झाल्यामुळे शरीरात सुस्तीची भावना निर्माण होते. तुम्हाला कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल करावीशी वाटत नाही. ज्याचा तुमच्या वजनावर परिणाम होतो, तुमच्या शरीरातील ऍक्टिव्ह लेव्हल कमी होते, ज्यामुळे तुम्हाला उठून स्वतःसाठी काही बनवायलाही आवडत नाही आणि तुम्ही जे समोर आहे तेच खात राहता.
* भूक न कळणे – फक्त जास्त खाल्ल्यानेच वजन वाढते, असे नाही. वेळेवर न खाणे आणि एकाच वेळी जास्त खाणे देखील वजनावर परिणाम करते. तणावाच्या वेळी आपल्याला भूक लागल्याचे कळत नसते आणि कधी-कधी आपण काहीच खात नाही. आणि याउलट कधी-कधी भुकेपेक्षा थोडे जास्तच खातो. त्यामुळे त्याचा आपल्या वजनावर परिणाम होऊ लागतो.