Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कामाच्या नादात दिवसेंदिवस कंबरदुखीचा त्रास वाढत चाल्लाय? मग ही बातमी नक्की वाचा

by प्रभात वृत्तसेवा
July 6, 2022
in आरोग्य वार्ता
A A
कामाच्या नादात दिवसेंदिवस कंबरदुखीचा त्रास वाढत चाल्लाय? मग ही बातमी नक्की वाचा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

जेव्हा जेव्हा मणक्‍यामध्ये दोष यायला सुरुवात होते तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक मणक्‍यातून निघणाऱ्या नसांवर झाल्यामुळे दाब येण्यास सुरुवात होते. या नसांमधील एक नस कमरेपासून खाली पायापर्यंत संवेदना पोहोचवण्याचे काम करत असते. या नसेचे दुखणे जेव्हा सुरू होते त्या दुखण्याला सायटिकाचे दुखणे असे संबोधले जाते. सायटिकाच्या दुखण्यात कमरेपासून थेट पायापर्यंतचा भाग दुखत असल्याची तक्रार संभवते.

कोणत्याही कारणाने मणक्‍याच्या नैसर्गिक वक्रतेला बाधा निर्माण होऊ लागल्यास कंबरदुखीचा त्रास सुरू होण्याची शक्‍यता असते. कमरेच्या मणक्‍यातील ही नैसर्गिक वक्रता चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे, सतत पोक काढून बसल्यानेही बिघडू शकते. परिणामी कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. आपल्या शरीराच्या हालचाली करताना सतत दक्ष असणे आवश्‍यक आहे. काही वेळा अंगविक्षेप तसेच गमंत म्हणून अंग वेगवेगळ्या कोनात फिरवणे, चुकीच्या पद्धतीत व्यायाम करणे, शरीराच्या कुवतीपेक्षा अंग जास्त प्रमाणात ताणणे, सतत चुकीच्या पद्धतीत बसणे, इतकेच नाही तर चुकीच्या पद्धतीत झोपल्यानेही कंबरदुखीचा त्रास होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

रोजच्या शारीरिक हालचाली बरोबर शरीरांतर्गत झालेल्या इतर तक्रारीमुळेही कंबरदुखी संभवते याचे कारण म्हणजे कंबरेच्या मणक्‍यातून निघणाऱ्या नसा जशा पायाकडे संवेदना पोहोचवण्याचे काम करतात त्याचप्रमाणे त्या नसा पोटांतर्गत अवयवांना देखील संवेदनांचा पुरवठा करण्याचे काम करीत असतात. उदाहरणार्थ कधी कधी मूत्रपिंडाच्या त्रासातही कंबरदुखीची तक्रार संभवते. याबरोबर ताप येणे, अंगावर सूज येणे, वजन कमी होणे, लघवी आणि शौचावरील ताबा कमी होणे या आणि यासारखी इतरही काही लक्षणे अशा तक्रारीबरोबर दिसून येतात.

कंबरदुखी ही एकच तक्रार असली तरी प्रत्येकाच्या दुखण्याचा जोर कमी अधिक प्रमाणात असू शकतो. काहींच्या बाबतीत हे दुखणे सतत राहते तर काहींना दिवसभरातील काही काळातच दुखणे जाणवते. दुखण्याची संवेदना ही व्यक्तीगणिक बदलत असते. काही व्यक्तींना सतत कळा येतात तर काहींना ठसठसल्यासारख्या वेदना येत राहतात. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुरूप तक्रारींना आराम पडण्याऱ्या गोष्टी देखील वेगवेगळ्या असतात. काहींना दुखरा भाग दाबून घेतल्यावर बरे वाटते तर एखाद्या व्यक्तीला दुखरा भाग दाबल्याने वेदनेची तीव्रता वाढते. काहींना गरम पाण्याचा शेक घेतल्याने बरे वाटते तर काहीचे दुखणे शेकल्याने वाढते. व्यक्तीनुरूप या गोष्टी बदलू शकतात. अशा वेळी होमिओपॅथीक वैद्यक शास्त्रामधील व्यक्तीसापेक्ष औषधे प्रचंड फायदेशीर ठरतात. कंबरदुखीच्या त्रासामध्ये काही तपासण्या करून घेणे अतिशय आवश्‍यक असते. तपासण्यांमुळे मणक्‍यातील तसेच खुब्यातील दोष समजून येण्यास मदत होते. त्याचा सखोल आणि अचूक अभ्यास करून पोश्‍चरथेरपीद्वारे निश्‍चित उपचार करता येतात.

-कंबरदुखीचा त्रास होऊच नये यासाठी खबरदारी
-अवजड वस्तू एकाच हाताने न उचलता दोन भागात विभागून घेऊन दोन्ही हाताने उचलाव्यात.
-जमिनीवर खाली पडलेली वस्तू उचलण्याकरिता फक्त कमरेतून न वाकता थोडेसे गुडघ्यामध्ये वाकून मगच उचलावी.
-खूप वेळ एकाच जागी उभे राहून किंवा बसून काम करायचे असल्यास किमान प्रत्येक एका तासाने उठून थोडीतरी शारीरिक हालचाल करून मगच पुन्हा काम सुरू करावे.
-बसताना पाठीच्या कण्याला पूर्ण आधार मिळेल अशी दक्षता घेण्याची सोय असावी.
-पायामध्ये योग्य प्रकारची पादत्राणे वापरावीत.
-नियमित आणि योग्य असा आहार असावा.
-तुमच्या प्रकृतीनुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावेत.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar