[[{“value”:”
Kajal for Babies । लहान बाळाच्या डोळ्यांमध्ये काजळ लावण्याची आहे. असे सांगितले जाते की काजळ लावल्यामुळे बालकांचे डोळे मोठे होतात आणि त्याचा डोळ्यांना फायदा होतो. मात्र यात खरोखरीच सत्यता आहे का?
लहान बालकांना नजर लागू नये म्हणून कपाळावर काजळाचा टीका लावण्याची पद्धत आहे. भारतीय कुटुंबांमध्ये बाळाचा जन्म झाला, की पाचव्या किंवा सहाव्या दिवशी बाळाच्या डोळ्यात काजळ लावण्याची पद्धत पिढ्यानपिढ्या पाळली जाते. साधारणपणे असे दिसते, की बाळाच्या डोळ्यांमध्ये बोटाने भरपूर काजळ लावले जाते. काही लोकांचे असेही म्हणणे आहे, की काजळ लावण्यामुळे बालकाचे डोळे मोठे होतात. मात्र यात खरोखरच सत्यता आहे का? बाळाच्या डोळ्यात काजळ लावणे योग्य आहे का?
भारतीय कुटुंबामध्ये आजी-आई बाळाच्या डोळ्यांमध्ये भरपूर काजळ लावतात. काजळ डोळ्यांसाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. कदाचित तुमच्याही डोळ्यात लहानपणी आईने किंवा आजीने भरपूर काजळ लावलेले असणार. मात्र या संदर्भात डॉक्टरांची वेगवेगळी मते आहेत.
Kajal for Babies । तज्ञांचे मत काय आहे?
आपल्या डोळ्यांच्या वरच्या भागात लेक्रॅइमल ग्रांड नावाची ग्रंथी असते ज्यामधून अश्रू येतात आणि जेव्हा डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करतात निघतात तेव्हा हे अश्रू डोळ्यातील कॉर्निया मध्ये पसरतात आणि तेथील सूक्ष्म अशा नळी मधून डोळ्याच्या कोपऱ्यात जमा होतात आणि तेथून खाली वाहू लागतात. अश्रू आपल्या डोळ्यांचे कोरडेपणा, कचरा, धूळ अशा गोष्टींपासून रक्षण करून डोळे निरोगी राहण्यासाठी मदत करतात. बाल आणि शिशु रोग तज्ञ डॉ. शीतल अगलेचा यांच्या सांगण्यानुसार काजळ लावल्यामुळे अश्रू वाहणाऱ्या सूक्ष्म नळ्या जाम होऊ शकतात आणि अशा परिस्थितीत अश्रू वाहू शकणार नाहीत.
Kajal for Babies । डोळ्यांमध्ये संसर्ग होण्याची भीती…
काजळ हे खूप घट्ट आणि चिकट असते. त्यामुळे जेव्हा ते डोळ्याला लावले जाते तेव्हा त्यावर धूळ माती चिटकू शकते आणि त्यातून मग डोळ्याला संसर्ग होण्याची शक्यता वाढते. डॉक्टर शीतल अगलेचा यांच्या सांगण्यानुसार काजळ लावण्यामुळे बाळाचे डोळे मोठे काजळ लावल्यामुळे मोठे होत नाहीत. सत्य परिस्थिती अशी आहे, की कुठल्याही बाळाचा डोळ्यांचा आकार हा अनुवंशिकतेतवर अवलंबून असतो. आई-वडिलांचे डोळे मोठे असतील तर बाळाचे डोळे देखील मोठे असतात किंवा आई-वडिलांच्या डोळे बारीक असतील तर बाळाचे डोळे ही बारीकच असतात.
बाळाची त्वचा ही अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे बाळाला शक्यतो काजळ लावू नये. कारण काजळामध्ये हल्ली रसायनांचाही वापर केलेला असतो. त्याची मुलांना ऍलर्जी होऊ शकते. त्याचबरोबर नवजात बाळाच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्ट्स देखील वापर करू नये, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
The post काजळ लावल्यामुळे मुलांचे डोळे मोठे होतात का? जाणून घ्या ‘सत्य’ appeared first on Dainik Prabhat.
“}]]