Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कांद्याचा रस लावल्याने खरेच नवीन केस येतात का?

by
April 18, 2023
in आयुर्वेद
A A
कांद्याचा रस लावल्याने खरेच नवीन केस येतात का?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

रुणांमध्ये केस गळणे आणि टक्‍कल पडण्याची समस्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बिघडलेली जीवनशैली आणि आहारातील पोषणाचा अभाव यामुळे अशा समस्या लोकांमध्ये अधिक दिसून येत आहेत. केसगळती थांबवण्याचा आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देणारी अनेक कॉस्मेटिक उत्पादने विकली जात आहेत,

परंतु ते खरोखर कार्य करतात का?
दरम्यान, केस निरोगी ठेवण्यासाठी कांद्याचा रस लावण्याच्या पद्धतीबाबत सध्या बरीच चर्चा आहे. असे म्हटले जात आहे की, कांद्याच्या रसाने दररोज बाधित भागाची मालिश केल्याने केस गळणे थांबतेच पण नवीन केसांची पुन्हा वाढदेखील होते.

अमेरिकन ऍकॅडमी ऑफ
डर्मेटोलॉजीच्या मते, केस गळणे ही स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही सामान्य स्थिती आहे. केस गळणे किंवा केस गळण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे एन्ड्रोजेनेटिक एलोपेशिया नावाची अनुवांशिक स्थिती. याशिवाय काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे किंवा हार्मोनल समस्यांमुळेही केस गळू शकतात.
कांद्याचा रस केसांच्या अनेक समस्या जसे की टाळूची खाज सुटणे किंवा कोरडे होणे, केस गळणे, कोंडा, केस अकाली पांढरे होणे आणि नवीन केस वाढण्यास मदत करू शकतो.

तथापि, केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस वापरण्यावर व्यापक संशोधन झालेले नाही. तथापि, जर्नल ऑफ डर्माटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका लहानशा अभ्यासात असे दिसून आले आहे की, कांद्याचा रस टाळूवर लावल्याने काही लोकांमध्ये केस पुन्हा वाढण्यास मदत होऊ शकते. या अभ्यासात अशा सहभागींचा समावेश होता ज्यांना अलोपेसिया एरियाटा होता, ज्यामध्ये केस पॅचमध्ये गळतात.

कांद्याचा रस दिवसातून दोनदा वापरल्यानंतर 2 आठवड्यांनंतर केसांची वाढ सुरू झाल्याचे संशोधकांना आढळले. सुमारे 74 टक्के सहभागींना 4 आठवड्यांनंतर केस पुन्हा वाढले, आणि सुमारे 87 टक्के लोकांना 6 आठवड्यांनंतर केस पुन्हा वाढण्याचा अनुभव आला.

कांद्याचा रस केसांना लावल्याने केसांच्या मुळांना पोषकसत्त्वे मिळून त्यांची मजबुती सुधारते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. हे केस तुटणे आणि पातळ होणेदेखील कमी करू शकते. कांद्यामध्ये असलेले सल्फर हे कांद्याचा रस केसवाढीस मदत करते असे मानले जाते. एंजाइम आणि प्रथिनांच्या पुरेशा उत्पादनासाठी सल्फर आवश्‍यक आहे. कांद्याच्या रसामध्ये असलेले सल्फर केसांच्या वाढीसाठी आवश्‍यक पोषण पुरवू शकते.

केसांच्या वाढीसाठी आणि कंडिशनिंगसाठी कांद्याचा रस वापरल्याने काही लोकांना फायदा होऊ शकतो; परंतु ते सर्वांसाठी फायदेशीर असू शकत नाही. याशिवाय कांद्याचा रस वापरल्याने केसांची वाढ लवकर होत नाही. त्याचा सकारात्मक परिणाम होण्यासाठी काही आठवडे देखील लागू शकतात, परिणाम मिळणेदेखील आवश्‍यक नाही. केसगळतीचे कारण आणि त्यावर आधारित उपचार पद्धती जाणून घेण्यासाठी त्वचारोग तज्ज्ञांची मदत घ्या.

The post कांद्याचा रस लावल्याने खरेच नवीन केस येतात का? appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar