Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कांद्याचा रस खरच नवीन केस वाढवतो का? अभ्यासात आढळले ‘हे’ तथ्य !

by
February 22, 2023
in फिटनेस
A A
कांद्याचा रस खरच नवीन केस वाढवतो का? अभ्यासात आढळले ‘हे’ तथ्य !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

तरुणवर्गात सध्या केस गळण्याची समस्या सर्रास दिसून येत आहे. दर पाच तरुणांपैकी एकाला केस लवकर गळणे, लहान वयात टक्कल पडणे या समस्या दिसतात. ज्यासाठी खराब जीवनशैली, आहारातील समस्या आणि रसायनयुक्त पदार्थांचा अतिवापर ही प्रमुख कारणे आहेत. ही समस्या टाळता येईल का? केसगळती रोखण्यासाठी आणि नवीन केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी लोक अनेक घरगुती उपाय सुचवत असतात. कांद्याचा रस केसांना लावणे हा असाच एक लोकप्रिय उपाय आहे, पण त्याचा खरोखर फायदा होतो का? वैद्यकीय शास्त्रात या उपायाला काय आधार आहे?

असा दावा करण्यात आला आहे की कांद्यामध्ये अनेक संयुगे आणि पोषक तत्वे असतात ज्यांची आपल्या केसांना योग्य पोषणासाठी नियमित गरज असते. अशा स्थितीत कांद्याचा रस केसांना लावल्यास केसांचे पोषण होते, त्यांचे तुटणे कमी होते, एवढेच नाही तर नवीन केस येण्यासाठीही हा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. चला तर, यासंबंधीच्या अभ्यासात काय आढळले ते जाणून घेऊया.

* केसांसाठी कांद्याच्या रसाचे फायदे
संशोधकांना असे आढळून आले की कांद्याचा रस अनेक प्रकारे केस गळणे टाळण्यास मदत करतो. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते जे केसांच्या पोषणासाठी आवश्यक असते. सल्फर अमीनो ऍसिडमध्ये आढळते, जे प्रथिनांचे घटक आहेत. प्रथिने, विशेषत: केराटीन, केस मजबूत करण्यासाठी आणि नवीन केस वाढवण्यासाठी एक आवश्यक घटक आहे. अशावेळी कांद्याचा रस वापरल्यास केस निरोगी राहण्यास मदत होते, असा दावा केला जातो.

* अभ्यासात काय आढळले?
कांद्याचा रस केसांसाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेण्यासाठी संशोधकांच्या टीमने एक अभ्यास केला. यामध्ये एका गटाला रोज कांद्याचा रस डोक्याला लावण्यासाठी दिला जात होता. या संशोधनाच्या निष्कर्षात असे आढळून आले आहे की ज्यांनी कांद्याचा रस लावला त्यांच्यामध्ये केसांची वाढ आणि मजबूती अधिक दिसून आली. त्याचे फायदे पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये दिसून आले आहेत. हा अभ्यास दशकाहून अधिक जुना असला तरी या विषयावर अधिक तपशीलवार संशोधनाची गरज आहे. कांद्यामध्ये असलेले पोषक तत्व केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे.

* तज्ञ काय म्हणतात?
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, केसगळती रोखण्यासाठी आणि त्यांचे पोषण करण्यासाठी कांद्याचा वापर वर्षानुवर्षे केला जातो. केस गळतीवर उपचार करण्यासाठी कांद्याचा रस प्रभावी असल्याचे अभ्यासात आढळले आहे, विशेषत: अलोपेसिया एरियाटामध्ये. अ‍ॅलोपेसिया एरियाटा ही एक स्वयंप्रतिकार स्थिती आहे ज्यामध्ये दाढी, मिशा किंवा टाळूच्या भागांतून अचानकपणे केस गळणे सुरू होते. कांद्याचा रस केसांची पुन्हा वाढ होण्यास मदत करतो. मात्र तज्ज्ञ हे देखील स्पष्ट करतात की, प्रत्येकाची त्वचा सारखी नसली तरी तुमचे केस गळत असतील तर या संदर्भात तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार असे घरगुती उपाय करावेत.

* केस निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
केस निरोगी ठेवण्यासाठी आणि तुटण्यापासून बचाव करण्यासाठी कांद्याचा रस लावणे फायदेशीर ठरू शकते, पण यासोबतच तुम्हाला वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार आणि औषधांचीही गरज आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केस निरोगी ठेवण्यासाठी आहाराचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनसत्त्वे, प्रथिने समृद्ध असलेल्या गोष्टी केसांना मजबूत करतात. केस निरोगी ठेवण्यासाठी नियमित योगा-व्यायामाची सवय लावणेही तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकते, असे संशोधकांना आढळले.

The post कांद्याचा रस खरच नवीन केस वाढवतो का? अभ्यासात आढळले ‘हे’ तथ्य ! appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar