[[{“value”:”
बंगळुरु – देशातील काही राज्यात पावसाने कहर केल्यानंतर आता डेंग्यूच्या साथीचा जोर वाढला आहे. याच दरम्यान कर्नाटक राज्याने डेंग्यू आजाराला साथ म्हणून जाहीर केले आहे. कर्नाटक सरकारने डेंग्यू आजाराची वाढती प्रकरणे पाहून या आजाराला महासाथ म्हणून घोषीत केले आहे.
या आजाराच्या सर्व प्रकारच्या स्ट्रेनला अधिसूचनेत सामिल केले आहे. हा आजार आता महासाथ म्हणून जाहीर केल्याने डेंग्यू संदर्भात राज्यात अधिक काळजी घेण्यात येत आहे. या आजाराला महामारी म्हणून जाहीर केल्याने आता त्याच्या उपचार आणि बचावाचे नवे प्रोटोकॉल जारी करण्यात आले आहेत.
डेंग्यूच्या प्रकरणांवर राज्यात कठोर नजर ठेवली जात आहे. सर्व विभागांना डेंग्यू कंट्रोल करण्याचे आदेश दिले असल्याचे कर्नाटकाचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. रुग्णालयांना डेंग्यू रुग्णांसाठी व्यवस्था करण्यासाटी सूचना केलेल्या आहे. तसेच आशा वर्कर आता घरोघरी जाऊन जनतेचे प्रबोधन करीत आहेत. डेंग्यूमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
डेंग्यू अळ्यांना ओळखण्याचे आणि त्यांची पैदास रोखण्यासाठी विशेष मोहीमा राबविण्याचे आदेश दिले असल्याचे कर्नाटकाच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. यंदा जानेवारी ते जुलैपर्यंत राज्यात डेंग्यूचे सात हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच एकूण सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस डेंग्यूचा वाढत चाललेला धोका पाहूनच सरकारने त्याला महासाथ म्हणून घोषित केले आहे.आता प्रत्येक रुग्णालयात प्रति वॉर्ड 10 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.
The post कर्नाटकात डेंग्यूच्या साथीचा जोर वाढला; सरकारकडून महासाथ म्हणून घोषित appeared first on Dainik Prabhat.
“}]]