Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कर्क रोगाला कारणीभूत पाच पेय

by
January 17, 2023
in आहार
A A
कर्क रोगाला कारणीभूत पाच पेय
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोग होण्यामागे आहार हे प्रमुख कारण आहे. रसायने, तंबाखू, अल्कोहोल, पॅकबंद आणि प्रक्रिया केलेले अन्न ही यामागची प्रमुख कारणे आहेत. अशाच 5 शीतपेयांबद्दल वाचा, जी एक नाही तर दहा प्रकारच्या कर्करोगाचे कारण बनू शकतात.
कर्करोग हा एक जीवघेणा आणि प्राणघातक आजार आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि सर्वात प्रमुख आणि प्राणघातक कर्करोग म्हणजे स्तन, फुफ्फुस, तोंड, कोलन, गुदाशय, प्रोस्टेट, रक्त कर्करोग. कर्करोगाची कारणे म्हणजे तंबाखू, उच्च बॉडी मास इंडेक्‍स म्हणजेच लठ्ठपणा, दारूचे अमर्याद सेवन, फळे आणि भाज्यांचे कमी सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव आहे.

अल्कोहोल
अल्कोहोल हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. जे लोक रोज भरपूर मद्यपान करतात त्यांच्यामध्ये मान, यकृत, स्तन आणि मोठ्या आतड्यामध्ये कर्करोगाचा धोका अनेक पटींनी जास्त असतो. अगदी अधूनमधून दारू पिण्यासही मनाई आहे. जर एखादी महिला दिवसातून एकापेक्षा जास्त ग्लास मद्य सेवन करत असेल आणि पुरुष दोनपेक्षा जास्त पेये पितात तर कर्करोग होण्याची शक्‍यता जास्त असते.

बाटलीबंद पाणी
बाजारात उपलब्ध बाटलीबंद पाणीही कॅन्सरचं कारण आहे. बाटलीमध्ये बिस्फेनॉल-ए किंवा बीपीए आढळते, जे कॅन्सरसाठी जबाबदार आहे. बीपीए हा संप्रेरक विस्कळीत करणारा म्हणून काम करू शकतो, ज्यामुळे कर्करोग होतो. बीपीए एक्‍सपोजरमुळे स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि चयापचय विकारांचा धोका वाढतो.

कॉफी
कॉफी पिण्याच्या छंदामुळेही कर्करोग होतो. अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चच्या संशोधनानुसार अनफिल्टर्ड कॉफीमुळे मोठ्या प्रमाणात कर्करोग होतो. जर तुम्हाला कॉफी प्यायची असेल, तर तुम्ही फक्‍त क्रीम, साखर आणि चव नसलेली कॉफी पिऊ शकता, कारण साखर आणि मलईच्या स्वरूपात असलेल्या चरबीमुळे लठ्ठपणा वाढू शकतो आणि त्यामुळे रक्‍तातील साखर वाढू शकते आणि कर्करोगदेखील होऊ शकतो.

एनर्जी ड्रिंक्‍स
एनर्जी ड्रिंक्‍समध्ये भरपूर कॅफीन आणि साखर असते, ज्यामुळे लठ्ठपणा किंवा मधुमेह यांसारख्या अनेक प्रकारच्या कर्करोग-उद्‌भवणाऱ्या समस्या वाढू शकतात.

सोडा
जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार, गडद रंगाच्या सोड्यामध्ये असे काही घटक असतात, ज्यामुळे कर्करोग होतो. हा घटक अनेक प्रकारच्या कर्करोगासाठी जबाबदार असतो.

The post कर्क रोगाला कारणीभूत पाच पेय appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar