Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे

by प्रभात वृत्तसेवा
July 20, 2022
in आरोग्य वार्ता
A A
कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे

July 20th, 10:23amJuly 20th, 10:23am

प्रभात वृत्तसेवा

आरोग्य जागर

आपल्या आजूबाजूला असे अनेक आजार दिसतील, जे आपल्याला क्षणार्धात त्यांच्या विळख्यात घेतात. पण असे अनेक रोग आहेत जे आपल्या शरीरावर हळूहळू आक्रमण करत राहतात, पण आपण त्यांना ओळखू शकत नाही. त्यामुळे हे महत्त्वाचे आहे की, या समस्या वेळेत ओळखल्या गेल्या पाहिजेत. त्यांची लक्षणे ओळखली पाहिजेत आणि डॉक्‍टरांशी त्वरित संपर्क साधला पाहिजे, जेणेकरून डॉक्‍टर तुम्हाला औषधांच्या मदतीने पुन्हा निरोगी बनवू शकतील. आपल्या सर्वांना माहीत आहे की, कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि जर वेळेत त्यांच्याबद्दल माहिती मिळाली तर त्यांच्यावर उपचार करून रुग्ण पुन्हा निरोगी होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

खाज सुटणारी त्वचा
जर तुमची त्वचा नेहमी खाजत असेल तर ते कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. उदाहरणार्थ, नाकपुडीत खाज सुटणे आणि गुप्तांगात खाज येणे. म्हणून, त्वचेवर खाज सुटण्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, त्वरित डॉक्‍टरांशी संपर्क साधणे हा एक चांगला पर्याय आहे.

नेहमी पोट खराब होणे
जर तुमचे पोट नेहमी खराब होत असेल तर तुम्हाला सतर्क राहणे आवश्‍यक आहे. कारण ते कर्करोगाचे लक्षण असू शकते. पातळ किंवा कठोर मल किंवा वारंवार शौच, मलात रक्‍त येणे ही देखील त्याची चिन्हे असू शकतात.

वजन कमी होणे
जेव्हा एखाद्याला पोटाचा कर्करोग असतो तेव्हा त्या व्यक्‍तीचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते. एवढेच नाही, जर तुम्हाला अधिक खाण्याची इच्छा असेल, पण खाण्यास असमर्थ असाल, यासारख्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडतात, तर तुम्हालाही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

दीर्घकाळ घसा खवखवणे
जर एखाद्या व्यक्‍तीला घशात बराच काळ दुखत असेल तर ही लक्षणे स्वरयंत्राच्या कर्करोगाची असू शकतात. जर तुम्हाला आवाज बदलणे, श्‍वास घेण्यास अडचण, घशात खवखव यासारख्या समस्या असतील तर त्वरित तुम्ही डॉक्‍टरांशी संपर्क साधावा.

Digital Prabhat
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar