लंडन – जगाच्या पाठीवरील सर्वच देशांमध्ये कर्करोग आणि हृदयविकार प्राणघातक समजले जातात पण आता कर्करोगाशी किंवा हृदयविकाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या दोन्ही विकारांवर एक लस विकसित करण्यात येणार असून या लसीची एक मात्रा घेताच या दोन्ही विकारांवर मात करणे शक्य होणार आहे.
ब्रिटनमधील मॉडर्न या प्रमुख औषधी कंपनीतर्फे हा दावा करण्यात आला असून गार्डियन वृत्तपत्रामध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध झाली आहे. मॉडर्न कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पॉल बर्टन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 2030 पर्यंत या दोन्ही विकारांवरील लस विकसित होऊ शकेल. या कंपनीने करोना महामारीच्या कालावधीमध्ये सुद्धा प्रभावशाली वॅक्सिन विकसित केली होती. आता त्यांनी कर्करोग आणि हृदयविकार या दोन्ही रोगांवर लक्ष केंद्रित केले आहे.
मानवी शरीराला त्रास देणाऱ्या विविध प्रकारच्या ट्युमरचा अभ्यास करून त्याच्यावर मात करण्याच्या दिशेने या कंपनीने हालचाली सुरू केल्या आहेत. शरीरातील पेशींचा अभ्यास करून या पेशी जास्त सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून हा अभ्यास करण्यात आला असून सशोधनावर आधारित लस विकसित करण्यात येणार आहे.
The post कर्करोग,हृदयविकारासाठी आता लसीकरण ! एक डोस घेताच व्याधी होणार समूळ नष्ट appeared first on Dainik Prabhat.
