Monday, February 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

करू साजरा पोषण मास, संतुलित आहाराची धरू कास! – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
September 26, 2021
in आरोग्य वार्ता
A A
करू साजरा पोषण मास, संतुलित आहाराची धरू कास! – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

करोनाच्या दोन लाटांवर स्वार होऊन आत्ता कसे तरी धडपडत आपण त्यातून बाहेर पडत आहोत आणि परत तिसरी येणार येणार असा डंका सगळीकडे सुरू झाला आहे! या सगळ्या काळात एक चांगली गोष्ट घडली – सर्वांनाच आपल्या आरोग्याचे आणि आहाराचे महत्त्व लक्षात आले.

या सामाजिक आरोग्याच्या पुनर्बांधणीच्या काळात अनेक करोना योद्‌ध्यांनी मोलाचे योगदान दिले. यातील एक महत्त्वाचा करोना योद्धा म्हणजे प्रशिक्षित आहारतज्ज्ञ! त्यांचं नाव मात्र करोना योद्‌ध्याच्या यादीमध्ये कोठेतरी हरवलेले दिसले. 1 ते 30 सप्टेंबर या काळात साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्याच्या निमित्ताने आरोग्य सेवेतील या महत्त्वाच्या दुव्याबद्दल बोलायलाच हवे!

आहारतज्ज्ञ विविध स्तरांवर काम करतात. काही आहारतज्ज्ञ हॉस्पिटलमध्ये काम करतात. तिथे वॉर्डमध्ये, आयसीयूमध्ये (सध्या पीपीटी किट घालून!) पेशंटच्या आहाराची काळजी घेतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांना धीर देतात. अतिशय महत्त्वाचं काम. कारण या काळातही आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. योग्य आहाराने लवकर बरे व्हायला मदत होते. पेशंटना हॉस्पिटलमध्ये कधी कधी नाकात नळी घालून किंवा शिरेवाटे आहार पुरवावा लागतो. तो काय द्यायचा कसा द्यायचा हे देखील प्लॅनिंग आहारतज्ज्ञ करतात.

काही आहारतज्ज्ञ ओपीडीमध्ये किंवा त्यांच्या क्‍लिनिकमध्ये (सध्या ऑनलाइनसुद्धा!) आहारविषयक सल्ला देतात. मधुमेह, हृदयविकारासारखे आजार असोत, पोस्ट कोविड जाणवणारे त्रास असोत, अथवा वजन घटविण्याचे/वाढविण्याचे आव्हान असो. कोणतेही साईड इफेक्‍ट्‌स न होता शास्त्रशुद्ध पद्धतीने लॉंग टर्म आहाराचे नियोजन करण्याचे, पोषक आहार घ्यायला लोकांना उद्युक्‍त करण्याचे महत्त्वाचे काम प्रशिक्षित आहारतज्ज्ञ करत असतात. काही आहारतज्ज्ञ फूड इन्डस्ट्रीमध्ये काम करतात तर काही संशोधन कार्यामध्ये अविरत, शांतपणे आपापलं काम बजावत असतात. भारतातील या सर्व आहारतज्ज्ञांची संघटना म्हणजे “इंडियन डाएटेटीक असोसिएशन’ या संस्थेद्वारे तळागाळापर्यंत आहारविषयक व उत्तम पोषणाविषयक माहिती पोहोचवण्याचे, जनजागृतीचे कार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे.

भारत सरकारनेही सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून घोषित केला आहे. या महिन्यात आहार व पोषणविषयक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यामध्ये कुपोषित मुलांचा आहार सुधारणे, त्यांना पोषणयुक्‍त आहार पुरवणे, गरोदर स्त्री आणि स्तनदांमध्ये आहाराबद्दल जागरूकता पसरवणे, अंगणवाडी आणि बालवाडीमधील मुलांचे आरोग्य, योग्य वजन – उंची यांची तपासणी करून, उत्तम आहार – जीवनशैलीचे महत्त्व आधोरेखित करणे अशा विविध पातळ्यांवर काम केले जाते. या वर्षीच्या पोषण महिन्याचा विषय आहे –  कुपोषण छोड पोषण की ओर, थामे क्षेत्रीय भोजन की डोर!

 

इंडियन डाएटेटीक असोसिएशन, यांच्यातर्फे एक प्रश्‍नावली तयार करण्यात आली आहे. चला, या निमित्ताने आपण स्वतःमध्ये डोकावून पाहूया! यातील एका जरी प्रश्‍नाचे उत्तर नाही असे असेल तर सावधान! स्वतःला बदलण्याची योग्य वेळ म्हणजे – आज, आत्ता ताबडतोब!
आहाराविषयी योग्य सवयी आहेत का?
मी माझ्या प्रदेशात पिकणारे अन्न खातो का?
मी पाश्‍चात्यांचे अंधानुकरण तर करत नाही ना?
मी कुपोषणापासून दूर आहे का?
अतिपोषण किंवा स्थूलता हा कुपोषणाचाच प्रकार आहे, हे मला माहिती आहे का?
मला आहाराविषयी शास्त्रशुद्ध माहिती आहे का?
मी गुगल गुरूंकडून/परिचितांकडून मिळालेल्या कोणत्याही ऐकीव माहितीवर विश्‍वास ठेवतो का?
प्रशिक्षित आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतो का?
आहारतज्ज्ञांचा सल्ला घेण्यापूर्वी त्यांची शैक्षणिक पात्रता मी तपासून पहातो का?
मी कोणतातरी शॉर्ट कोर्स केलेल्या स्वयंघोषित डाएटिशिनची पायरी चढतो का?

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar