वॉशिंग्टन – कोणत्याही कारणाने मानसिक ताण-तणाव निर्माण झाला आणि मनात निराशेची भावना तयार झाली तर सर्वसामान्यांना नागरिक हा ताण-तणाव दूर करण्यासाठी आणि नैराश्य दुर घालवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असतात. संगीत ऐकणे ग्रंथ वाचन करणे किंवा पदार्थांचा आस्वाद घेणे हे त्यापैकी काही उपाय आहेत. नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे मानसिक ताण तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी म्हणजेच कम्फर्टेबल होण्यासाठी अमेरिकन नागरिकांची पिझ्झा या आहाराला पसंती आहे. तर तमाम भारतीयांनी मात्र खिचडीला पसंती दिली आहे.
साऊथ कॅरोलीना युनिव्हर्सिटीत झालेल्या एका संशोधनाप्रमाणे मानसिक ताण तणावाच्या परिस्थितीमध्ये किंवा अनुचित घटना घडल्यानंतर सर्वसामान्य नागरिक अशा आहाराला पसंती देतात जो आहार सर्वसाधारणपणे त्यांच्या नियमित आहारामध्ये नसतो जीवनात स्थैर्य प्राप्त झाल्यावर अनेक लोक लोकप्रिय ब्रँडचा आहार घेण्याकडे कल ठेवतात. पण सामान्य परिस्थितीमध्ये मात्र आहाराची परिस्थिती वेगळी असू शकते त्यामुळेच कम्फर्टेबल होण्यासाठी अमेरिकन सर्वसामान्य नागरिकांनी पिझ्झाला पसंती दिली आहे. तर भारतीय नागरिकांनी खिचडी या पदार्थाला प्राधान्य दिले आहे.
कम्फर्ट फूडचा आस्वाद घेतल्यामुळे लोकांच्या मनात समाधानाची भावना निर्माण होते आणि मानसिक ताण-तणावापासून त्यांना मुक्ती मिळते युनिव्हर्सिटीत झालेल्या संशोधनाप्रमाणे महिलांचे प्रमाण कम्फर्ट फूडचा आस्वाद घेण्यामध्ये जास्त आहे महिला जेव्हा तणावाखाली असतात तेव्हा त्या कम्फर्टेबल होण्यासाठी या कम्फर्ट फुटला प्राधान्य देतात.
The post कम्फर्टेबल होण्यासाठी तुम्ही कोणता आहार घेता? अमेरिकेत पिझ्झा लोकप्रिय तर भारतीयांची खिचडीला पसंती appeared first on Dainik Prabhat.