Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कमी झोपेने वाढते वजन – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
August 8, 2021
in आरोग्य वार्ता
A A
कमी झोपेने वाढते वजन – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

जास्त वजन हे हृदय रोग, मधुमेह, स्ट्रोक आणि काही विशेष प्रकारच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे. वजन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सुरक्षित पद्धतीने एका महिन्यात किलोपर्यंत वजन कमी करता येऊ शकते. विज्ञानाधारित या पाच पद्धतींनी आपण वजन नियंत्रणात आणू शकतो.

कार्बोहायड्रेट्‌सपेक्षा प्रथिनांचे चयापचय करण्यासाठी शरीराला अधिक कॅलरी खर्च कराव्या लागतात. दिवसभरातील एकूण कॅलरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण आपण 25 टक्क्‌यांपर्यंत वाढवले तर भुकेची इच्छा 50 टक्क्‌यांपर्यंत घटते. त्यामुळे कॅलरी घेणेही घटते.

कमी झोपेमुळे भूक कमी करणारे संप्रेरक घटते, भूक वाढते
झोप कमी झाल्यास भूक कमी करणाऱ्या लेप्टिन संप्रेरकाचा स्राव कमी होतो. जेवण पचवणारे घ्रेलिन संप्रेरक वाढते. एखादी व्यक्ती आठवड्यात पाच तास झोप घेत असेल तर तिचे वजन एक किलोपर्यंत वाढू शकते.

वेगाने जेवल्याने पोटात जास्त कॅलरी, भूक नियंत्रणात नसते
जेवण पचवणारे घ्रेलिन संप्रेरक व भुकेवर नियंत्रण करणारे संप्रेरक मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी 12 मिनिटे लागतात. वेगाने जेवण केल्यास मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचेपर्यंत आपण जास्त कॅलरी घेतो. त्यामुळे भूक नियंत्रणात नसते.

साखरयुक्त पेये, फळांचा रस टाळा. रोजचे एक साखरयुक्त पेय किलोपर्यंत वजन वाढवू शकते.
साखरयुक्त पेये व गोड फळांचा रस वजन नियंत्रण करणाऱ्या प्रणालीत अडथळा निर्माण करतो. कोला, फळांचा रस, एनर्जी ड्रिंक यातील एक पेय प्यायले व जेवणातून कॅलरी कमी केली नाही तर वर्षभरात जवळपास दोन किलोपर्यंत वजन वाढू शकते.

डाळी, सोयाबीन आणि प्रथिने यातून चांगले फायबर मिळते. ते कॅलरीचे प्रमाण कमी करतात. पालेभाज्यांतही उच्च फायबर व कमी कॅलरी असतात. त्यामुळे भुकेची जाणीव कमी होते. वजन कमी होण्यास मदत होते. शेंगादाण्यात प्रथिनांसह पौष्टिक पदार्थ असतात. ते वजन नियंत्रणात उपयोगी ठरतात.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar