Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कंबरेच्या मणक्‍यातील दोष – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
October 27, 2021
in आरोग्य वार्ता
A A
कंबरेच्या मणक्‍यातील दोष – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

साधारणत: महिन्याभरापूर्वी पंचेचाळीशीच्या दरम्यानची एक महिला कमरेचा एमआरआय रिपोर्ट घेऊन क्‍लिनिकमध्ये आल्या. त्यांच्या एका नातेवाईकांसाठी पोश्‍चर थेरपी आणि होमिओपॅथीक औषधाने खूपच छान गुण आल्यामुळे विश्‍वासाने त्यांनी या महिलेला आमच्या दवाखान्यात पाठवले होते.

सदर महिला कंबरदुखीने बऱ्याच वर्षांपासून त्रस्त होती. रोजच्या कामानिमित्त दररोज 25-30 किमी अंतर तिला दुचाकीवरुन प्रवास करावा लागत असे. कामाची निकड असल्याने ती अगदी मनापासून कित्येक वर्षे ही काम करत होती. अधूनमधून कंबर दुखत असल्याचे तिला जाणवत होते.

तरुण वयात तक्रारी पचवण्याची शरीराची ताकद असते. त्यामुळे दिवसभर कामात राहूनही कंबरेच्या त्रासाकडे सोईस्कर दुर्लक्ष होत असे. रात्रीच्या वेळी कंबर बाम लावून चोळून घेतली की, सकाळी पुनः कामाला हजर हा नित्य कर्म होता. एखादेवेळी कामाचा ताण वाढल्यावर तक्रारींचा जोरही वाढत असे. तात्पुरती औषधे घेऊन वेळ निभावली जात होती. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळाली आणि साधारण चार पाच वर्षापासून फिरतीचे काम कमी होऊन ऑफिसमध्ये बैठे काम सुरू झाले.

तेव्हा पासून शरीराच्या हालचालींवर गदा आली आणि कंबरेचे दुखणे वाढले.पंधरवड्यापूर्वी एका घरगुती कार्यक्रमासाठी ती परगावी गेली होती. कार्यक्रमामध्ये खूप धावपळ झाली. अनेक दिवसांनी नाचगाणे झाले. त्या दरम्यान तिच्या दुखण्याचा जोर नगण्य होता. परंतु परत आल्यानंतर कंबरेमध्ये जास्त वेदना होऊ लागल्या.

सकाळी ब्रश करण्यासाठी बेसिन जवळ थोडे ओणवे होतानाही खूप कळ येत होती. कंबरेच्या थोडे वर आणि कंबरेचा भाग खूपच आखडून गेला होता. सरळ होताना मोठा त्रास जाणवत होता. नितंबाकडील भागात मुंग्या येत होत्या. पायातील ताकद कमी झाली होती. त्यांनी तज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचारही करून घेतले. एमआरआय आणि इतर काही तपासण्याही केल्या. त्यामुळे थोडासा आराम वाटला मात्र पूर्ण तक्रारी कमी नसल्याने ती आमच्याकडे आली होती.

एमआरआय रिपोर्टस पाहून तिला हे समजावून सांगितले की, कंबरेच्या मणक्‍यातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मणक्‍यात दोष निर्माण झाला होता. मणक्‍यातील गादी म्हणजेच डिस्क सरकली होती. मणक्‍यांची रचना बदललेली होती. परिणामी मणक्‍यामधून जाणारी नस दबली जात होती. आतील नाजूक भागाला जास्त इजा होऊ नये याकरता पाठीचे, कमरेचे, मांडीच्या मागचे सर्व स्नायू आखडले होते.

यामुळेच तिला त्रास जाणवत होता. या तक्रारी शिवाय तिला बद्धकोष्ठतेची किंवा रोजच्या रोज पोट साफ न होण्याची तक्रार असल्याचेही तिने नमूद केले. विशेषत: कंबरेच्या मणक्‍यामध्ये अशा प्रकारचे दोष असल्यास ही तक्रार बहुतांश व्यक्ती करतात. कारण मणक्‍यातील नसा बाहेरच्या आणि आतल्या अवयवांनाही पुरवठा करीत असतात. जेव्हा नस दबली जाते तेव्हा दोन्हीकडच्या अवयवांच्या कार्यात बाधा निर्माण होऊन निरनिराळी लक्षणे दिसून येतात.

या महिलेच्या सर्व शंकाची पूर्तता झाल्यानंतर तिने पोश्‍चर थेरपीचे उपचार करून घेतले. प्रत्येक तासागणिक तिच्या तकारींची तीव्रता कमी कमी होत होती. सकाळी वाकताना होणार त्रास होत नव्हता. पाठीत आणि कंबरेत आलेला ताठपणा कमी झाला होता. पायातील ताकद पूर्ववत असल्यासारखे जाणवू लागले होते.

पुनः रोजची कामे अगदी सहजतेने करता येत असल्याचे जाणवत होते. तरीसुद्धा कंबरेच्या मणक्‍यातील दोष पूर्णतः घालवण्यासाठी काही महीने नेटाने तिच्या शरीरयष्टीनुसार ठरविक प्रकारचा व्यायाम करावयास सांगितले. या प्रकारे प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर आता तिला पोश्‍चर थेरपी आणि होमिओपॅथी या दोन्ही प्रकारच्या उपचार पद्धतीविषयी मोठा विश्‍वास निर्माण झाला होता.
– डॉ. दीप्ती पोतदार

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar