Sunday, October 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

औषधी बगीचा : इसबगोल – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
May 25, 2022
in आरोग्य वार्ता
A A
औषधी बगीचा : इसबगोल – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

प्लॅटॅगो ओव्हेटा
कुल : प्लॅंटॅजिनेसीई
विविधभाषी नावे-
हिंदी- इस्पद्युल,
गुजराथी – इथमुंजिरूं,
संस्कृत- ईशदगोल,
इंग्रजी- ब्लॉंड सिलीयम

गुणधर्म: बी शीतल, शामक, मूत्रल असून पचनसंस्था व मूत्रमार्गाच्या तक्रारींवर आमांश, बद्धकोष्ठता, अतिसार इ. वर वापरतात.

या झाडाच्या अनेक भागातील व भाषांमधील स्थानिक नावात इसबगोल या संस्कृत नावाचाच किंचित अपभ्रंश दिसतो. व्यावहारिक नाव देखील यांच नावावरुन आले आहे.

इसबगोल नैसर्गिक अवस्थेत वायव्य भारतात मर्यादित भागात सापडते परंतु इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लावले जाते.
बहुतकरुन खोडविरहित, लहान औषधी, दाट आणि मऊ केसाळ वाढीने आच्छादलेली; पाने 8-25 से.मी. लांब, फारच अरुंद, फुले लहान अंडाकृती किंवा नळकांड्याच्या आकाराच्या कणिसात, 1.5-4 से.मी. लांब; फळ 8 मि.मी. लांब, वरचा अर्धा भाग झाकणासारखा उघडतो. बिया बोटीच्या आकाराच्या असतात.

उपयुक्‍तता : या झाडाच्या बिया (या प्रजातीच्या इतर जातीप्रमाणेच) औषधी आहेत. बियांचे उपयोगी गुणधर्म मुख्यत: त्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या श्‍लेष्मकामुळे आणि भूणपोषी तत्त्वांमुळे असतात.

इसबगोल अनेक प्रकारच्या जुन्या आमांशात, जीवाणूंमुळे व हगवणीत फार उपयोगी आहे. त्यातील श्‍लेष्मक त्वचेच्या जखमा कमी करणारे आहे. तसेच बद्धकोष्ठतेतही उपयोगी आहे. बिया वापरण्याआधी पाण्यात भिजवल्यास त्या अन्ननलिकेत लवकर शोषल्या जातात. कोरड्या संपूर्ण बिया पोटात आग पडल्यासारखा त्रास निर्माण करतात, अन्ननलिकेत तांत्रिक अडसर निर्माण करतात. बियामधील मोठ्या प्रमाणातील श्‍लेष्मक मळ एकत्र करते व यामुळे मळाचे प्रमाण वाढते आणि ते विनासायास बाहेर निघण्यास मदत करते.

इसबगोलचे टरफल (हिंदी-इशबगुल कि भुसि) हे इसबगोलच्या बियावरील कोरडे आवरण आहे, ते बियांना कांडून पाखडून बाजूला काढले जाते. टरफलाचे गुणधर्म बियांसारखेच आहेत. परंतु बियापेक्षा जास्त गुणकारी असते. यामुळे अन्ननलिकेतला अडसर निर्माण होतो आणि आग पडते. टरफल घेतांना त्यांना भिजवण्याचीपण गरज नाही व पूर्ण बिया घेण्यापेक्षा ते वापरण्यास सोपे आहे.

बियाच्या भ्रूणापासून काढलेल्या तेलात 50% लिनोलिक आम्ल असते ते धमन्यांचा कठिणपणा घालवण्यास मदत करते. ते सूर्यफुलाच्या तेलापेक्षाही अधिक परिणामकारक आहे आणि सशांच्या शरीरातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी करते असे दिसून आले आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar