Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

औषधांशिवायही रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो, अमेरिकन तज्ज्ञाने सांगितले ‘हे’ उपाय!

by प्रभात वृत्तसेवा
December 31, 2021
in आरोग्य वार्ता
A A
औषधांशिवायही रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो, अमेरिकन तज्ज्ञाने सांगितले ‘हे’ उपाय!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

उच्च रक्तदाब (हाय ब्लडप्रेशर) ही प्रमुख आरोग्य समस्यांपैकी एक आहे ज्याने गेल्या दशकात लोकांना सर्वाधिक त्रास दिला आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हृदयविकारासारख्या गंभीर आरोग्य समस्यांमध्ये उच्च रक्तदाब हा एक घटक मानला जातो. त्यामुळे डॉक्टरही उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर डिसीज’ म्हणून वर्गीकृत करतात. अभ्यासात असे दिसून आले आहे की आहारातील व्यत्यय आणि शारीरिक निष्क्रियता यासारख्या अनेक वाईट जीवनशैलीच्या सवयी रक्तदाबाची समस्या वाढवतात, लोकांनी याबद्दल खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

आरोग्य तज्ञ म्हणतात, आपल्यापैकी बहुतेक लोक उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधे वापरत राहतात. या औषधांचा दीर्घकाळ वापर करणे हानिकारक असू शकते. अशा परिस्थितीत औषधांवरील अवलंबित्व कमी करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. हायपरटेन्शनची समस्या कमी करण्यासाठी अमेरिकन हेल्थ एक्सपर्ट डॉ. मायकल ग्रेगर यांनी काही उपाय सांगितले आहेत, ज्याचा वापर करून औषधांशिवायही रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. चला तर, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

* तज्ञ काय म्हणतात?
डॉ.मायकल ग्रेगर म्हणतात, उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी औषधांपेक्षा इतर नैसर्गिक पद्धती वापरण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी जीवनशैलीत काही साधे बदल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी उपवास हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. ज्या लोकांना बऱ्याच काळापासून उच्च रक्तदाब आहे त्यांना देखील वनस्पती-आधारित पदार्थांचे सेवन केल्याने फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया रक्तदाब कमी करण्याचे उपाय.

* रक्तदाब कमी करण्याचे मार्ग
डॉक्टर मायकल ग्रेगर यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी उपाय सांगितले आहेत. डॉ ग्रेगर म्हणतात, या उपायांचा वापर करून रक्तदाब नियंत्रणात सहज यश मिळू शकते.
. डॉ ग्रेगर स्पष्ट करतात की उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आहारात अधिक वनस्पती-आधारित गोष्टी (फळे आणि भाज्या) समाविष्ट केल्या पाहिजेत, यामुळे बीपी 7 गुणांनी कमी होतो.
. वनस्पती-आधारित आहार वाढवून आणि मांसाचे सेवन कमी करून, रक्तदाब 11 पॉइंट्सपर्यंत कमी केला जाऊ शकतो.
. अल्कोहोल सोडल्यास, तुम्ही उच्च रक्तदाबात अतिरिक्त 5 पॉइंट कमी करू शकता.
. याशिवाय वजन जास्त असणे हा देखील रक्तदाबाचा एक घटक मानला जातो. तुमचे वजन सुमारे 5 किलोने कमी केल्याने सिस्टोलिक बीपी 7 पॉइंट्सने कमी होऊ शकते.
. किमान 3 महिने नियमित एरोबिक व्यायाम केल्यास रक्तदाब 9 पॉइंट्सपर्यंत कमी होण्यास मदत होते.

* ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा !
डॉक्टर ग्रेगर यांनी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणखी काही मुद्द्यांकडे लक्ष देण्याचे सांगितले आहे.
. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी सोडियमचे सेवन कमी करावे, असे केल्याने तुम्ही बीपी १५ पॉइंट्सने कमी करू शकता.
. सोडियमचे प्रमाण कमी करण्यासाठी पूर्णपणे वनस्पती-आधारित आहार घेतल्यास रक्तदाब १८ पॉइंट्सपर्यंत कमी होण्यास मदत होते.
. ज्यांचा रक्तदाब जास्त राहतो त्यांच्यासाठीही उपवास फायदेशीर आहे. उपवासाच्या वेळी फक्त पाणी प्यायल्याने रक्तदाब 37 पॉइंट्सपर्यंत कमी होऊ शकतो.
. लक्षात ठेवा की उपवास एक दिवसापेक्षा जास्त आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.
. दररोज फळांचे रस, भाज्यांचे सूप इत्यादींचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar