Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ओसीडी आजाराची लक्षणे आणि उपाय – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
July 6, 2022
in आरोग्य वार्ता
A A
ओसीडी आजाराची लक्षणे आणि उपाय – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

19 वर्षांचा राहुल गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छतेबाबत अति खबरदारी घेऊ लागला, अंघोळीला गेल्यावर तासन्‌तास अंघोळ करत बसतो आणि शौचाला गेल्यावर अति पाण्याचा वापर करतो, सतत हात धुवत राहतो. हल्ली तो बऱ्याच क्रिया पुन्हा पुन्हा करतो, घरातील आवराआवरी साफसफाई यांकडे अति लक्ष देतो, घरातील एखादी किरकोळातील किरकोळ गोष्ट देखील ज्या दिशेला तोंड करून, जशा पद्धतीने ठेवली आहे ती थोडी जरी हलली तरीही ती सतत पूर्ववत ठेवत राहतो. तो सतत कोणत्या तरी विचारात असतो, गॅसचे बटण, घरातून बाहेर पडताना लावलेले कुलूप हे परत परत तपासण्याचे प्रमाण तर एव्हाना खूपच वाढले होते. राहुल आपल्या पैश्‍यांचे पाकीटही हल्ली वारंवार तपासतो. या सर्व गोष्टी त्याच्या आईच्या लक्षात आल्या म्हणून आईने त्याच्याशी या विषयावर अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला परंतु कधी तो विषय टाळून तर कधी आईवर चिडून राहुल याबद्दल बोलायला आपली अनिच्छा दाखवू लागला; म्हणून एक दिवस आई त्याला समुपदेशकाकडे घेऊन गेली.

समुपदेशनाच्या काही सेशन्स नंतर राहुल समुपदेशकाशी मोकळेपणाने बोलू लागला तेव्हा समजले की; राहुलला गेल्या वर्षभरापासून त्याच्या कॉलेजातील मुले रॅगिंग करत आहेत व आपल्याला या गोष्टीचा प्रतिकार करता येत नसून उलट आपण हे सगळं सहन करतोय याबद्दल त्याच्या मनात अपराधीपणाची भावना, न्यूनगंड व नाकर्तेपणाची भावना निर्माण झाली, गेले वर्षभर आपल्याला नेमका काय त्रास होतोय ते कोणाशीही मोकळेपणाने न बोलल्यामुळे राहुलची प्रचंड घुसमट होत होती व त्यातूनच या गोष्टीचा त्याच्यावर प्रचंड ताण येऊन भीती निर्माण झाली त्यातून चिंता वाढायला लागली, नकारात्मक विचार त्रास द्यायला लागले व या कोणत्याच मानसिक समस्येचे योग्य वेळेत निराकरण न झाल्याने काही महिन्यांपासून राहुल ओसीडी म्हणजेच ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर या मानसिक आजाराच्या कचाट्यात सापडला.

ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) ला मराठीमध्ये “कृती अनिवार्यता विकार’ असे म्हणतात. मुळात ओसीडी हा मानसिक आजार विचारांशी निगडित असतो. हा आजार असणाऱ्या व्यक्तीच्या मनात एखादा तोच तोच विचार सतत येत असतो आणि त्यावेळी त्याची चिंतेची पातळी प्रचंड वाढलेली असते अशावेळी त्यांना ज्या कृतीतून रिलॅक्‍स वाटेल ती कृती ते वारंवार करत राहतात. ती कृती न केल्यास त्यांची अस्वस्थता खूप वाढते त्यामुळे ती कमी करण्यासाठी सतत हात धुणे, पाण्याचा अतिवापर, तीच तीच कृती करत राहणे, सतत काही गोष्टी तपासून व्यवस्थित असल्याची खात्री करून घेणे; या कृती केल्यावरच त्यांच्या वाढलेल्या चिंतेचे तात्पुरते शमन होते.

उदा. मी देवाला नमस्कार केला नाही तर मला पाप लागेल म्हणून जुलमाचा राम राम करणे. मी नीट हात नाही जोडले किंवा व्यवस्थित नमस्कार नाही केला या भावनेने पुन्हा पुन्हा देवाला नमस्कार करत राहणे व त्यानंतर अस्वस्थता कमी होणे.
ओसीडी हा आजार आपण वर बघितलेल्या राहुलच्या केससारख्या काही परिस्थितीजन्य गोष्टी घडल्यास होऊ शकतो परंतु त्याचबरोबर हा आजार अनुवांशिक देखील असतो. ऑब्सेसिव्ह म्हणजे वारंवार मनात येणारे अनिच्छित त्रासदायक विचार. बऱ्याचवेळा या आजाराची लक्षणे किशोरावस्थेत सुरू होतात. या रुग्णांच्या विवेकशक्ती, ज्ञान, भाषा यांमध्ये काहीही बिघाड झालेला नसतो केवळ काही वाईट घडू नये याबद्दलची अतीव चिंता त्यांना सतत त्रास देत असते व याचसाठी ते एखादी कृती वारंवार करतात.
मेंदूमधील सिरोटोनीन व डोपामाईन नामक रसायनांचा विशिष्ट भागातील समन्वय बिघडल्याने आपली कृती निरर्थक व त्रासदायक असूनही ती रुग्णांना थांबवता येत नाही आणि ज्यावेळी ती थांबविण्यासाठी ते प्रयत्न करतात तेव्हा त्यांना होणाऱ्या मानसिक वेदना असहाय्य असतात.
मानसशास्त्राप्रमाणे “ओसीडी’ हे सुप्तमनात दबलेल्या असुरक्षिततेचे बाह्यरूपांतरण आहे.

ओसीडी आजाराची लक्षणे –
एकच कृती परत परत करणे
पुन्हा पुन्हा हात धुणे
सतत काहीना काही मोजत राहणे
शरीराच्या स्वच्छतेबाबत अतिसंवेदनशीलता
वाईट विचार व आपल्या हातून काहीतरी लाजिरवाणे घडण्याची भीती
विशिष्ट ध्वनी किंवा संख्या मोजणे यात मानसिक व्यस्तता
काहीतरी भयंकर घडणार आहे या भीतीच्या दबावाखाली सतत राहणे
वस्तू सतत क्रमवारी लावणे
कपड्यांचे झिप व बटणे वारंवार तपासणे
दिवे, उपकरणे व दरवाजे बंद आहेत ना याची वारंवार तपासणी करणे
काही शारीरिक क्रियाकलापांची पुनरावृत्ती जसे की खुर्चीवरून उठणे-बसणे
एकच प्रश्‍न पुन्हा पुन्हा विचारणे व तेच तेच बोलणे
सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळणे
अखंड प्रार्थना करणे
अस्वस्थता
ताण
प्रचंड चिंता
निद्रानाश
नैराश्‍य

ओसीडीवरील उपाय –
परिस्थीतीतील अचानक झालेला बदल स्वीकारणे
मनात येणारे विचार न थांबवता त्यांची दिशा बदलणे
माझ्या स्वच्छतेच्या सवयी व वैचारिक आंदोलने अनैसर्गिक आहेत हे सतत
स्वतःला सांगत राहणे
विचारांची अनियंत्रित साखळी रोखण्यासाठी स्व-संवादाकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे.
समुपदेशन
सीबीटी (कॉग्निटिव्ह बिहेव्हिअर थेरपी)
आरईबीटी (रॅशनल इमोटीव्ह बिहेव्हिअर थेरपी)
नियमित औषोधोपचार
औषधांच्या नियमित सेवनामुळे मेंदूतील विचार व भावनांचे संदेशवहन हळूहळू सुधारते व त्याचबरोबर उपयुक्त जीवनशैली आत्मसात केल्यास रुग्ण नक्कीच बरा होऊ शकतो.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar