Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘ओमायक्रॉन’बाबत चिंता कमी करणारी चांगली बातमी समोर

by प्रभात वृत्तसेवा
December 23, 2021
in आरोग्य वार्ता
A A
‘ओमायक्रॉन’बाबत चिंता कमी करणारी चांगली बातमी समोर
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली – ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. सरकारने त्याचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आता चिंता कमी करणारी एक चांगली बातमीही आता समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी ओमायक्रॉनबाबत केलेल्या अभ्यासानंतर केलेला दावा याबाबतची भीती कमी करणारा ठरला आहे.

ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये इतर व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्यांच्या तुलनेत ओमायक्रॉन झालेले रुग्ण रुग्णालयात दाखल करण्याची शक्‍यता 80 टक्के कमी आहे, अशी माहिती या अभ्यासातून समोर आली आहे. याचाच अर्थ ओमायक्रॉनची लागण झाल्यावर हॉस्पिटलाझेशन करावे लागण्याची शक्‍यता तुलनेने कमी असल्याचे ही माहिती सूचवत आहे. तसे जर असेल आरोग्य यंत्रणांवर येणारा संभाव्य ताण कमी होणार आहे.

याशिवाय, ओमायक्रॉनची लागण झालेल्या लोकांना इतर व्हेरिएंटची लागण झालेल्या लोकांच्या तुलनेत गंभीर आजार होण्याची शक्‍यता 70 टक्‍क्‍यांनी कमी आहे, अशीही माहिती दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलेल्या आभ्यासातून समोर आली आहे. मात्र, ओमायक्रॉन किती वेगाने पसरू शकतो, हे त्या त्या देशातील लसीकरणाच्या प्रमाणावर अवलंबून आहे.

दरम्यान, भारतात लसीकरण झालेल्या लोकांपैकी 90% लोकांना ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका कमी आहे. अशी माहिती यापूर्वी झालेल्या प्राथमिक संशोधनातून समोर आली होती. याशिवाय अमेरिकन औषध निर्माती कंपनी मॉडर्नानेदेखील त्यांनी बनवलेला बुस्टर डोस हा ओमायक्रॉनवर प्रभावी असल्याचा दावा केला होता. त्यामुळे एकूणच आशेचा किरण दिसतो आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar