Saturday, April 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ओप्पोचा पहिला फोल्डेबल फोन ‘ओप्पो फाईंड एन’ होतोय 15 डिसेंबरला लॉन्च !

by प्रभात वृत्तसेवा
December 12, 2021
in लाईफस्टाईल
A A
ओप्पोचा पहिला फोल्डेबल फोन ‘ओप्पो फाईंड एन’ होतोय 15 डिसेंबरला लॉन्च !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

ओप्पोच्या (Oppo) फोल्डेबल फोनबद्दल सतत लीक रिपोर्ट्स येत होत्या, मात्र आता कंपनीने याची पुष्टी केली आहे. 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात ओप्पो फाईंड एन (Oppo Find N) लाँच केला जाईल. 

Oppo Find N हा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल. Oppo Find N साठी कंपनी गेली चार वर्षे संशोधन करत आहे. अधिकृत टीझरनुसार, Oppo Find N चे डिझाईन Samsung Galaxy Z Fold सीरीज सारखे असेल.

ओप्पोचे मुख्य उत्पादन अधिकारी आणि वनप्लसचे संस्थापक पिट लाऊ यांनी एका खुल्या पत्राद्वारे ओप्पो फाइंड एन लॉन्च केल्याची पुष्टी केली आहे. Oppo Find N मेटल फिनिशसह उपलब्ध असेल आणि दोन भिन्न OLED डिस्प्ले उपलब्ध असतील.

पिट लाऊ यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, या फोनमध्ये आम्ही मागील फोल्डेबल स्मार्टफोनच्या डिस्प्लेवरील क्रीज आणि फोनच्या एकूण गुणवत्तेसह येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. Oppo ने ट्विटरवर 15 सेकंदाचा टीझर व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

टीझरनुसार, Oppo Find N सह एक अंडर डिस्प्ले कॅमेरा उपलब्ध असेल. फोनची रचना मुख्यत्वे Samsung Galaxy Fold सारखीच आहे. टीझरनुसार, फोन यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सरसह लॉन्च केला जाईल.

Oppo चा वार्षिक कार्यक्रम 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे, जो आभासी असेल. Oppo चा हा Oppo Inno Day 2021 इव्हेंट चीनच्या शेनझेन शहरात 14-15 डिसेंबर रोजी होणार आहे. हा कार्यक्रम 14 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.

कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन अभ्यागत कार्यक्रमासाठी नोंदणी करू शकतात. काही दिवसांपूर्वी फोल्डेबल फोनसाठी चीन सरकारकडून मिळालेल्या प्रमाणपत्राचे चित्रही समोर आले आहे. Oppo च्या फोल्डेबल फोनला “PEUM00” असे कोडनेम आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar