पुणे – कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. भारतातही संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिक आपल्या बसले असून, वर्क फ्रॉम होम करत आहे. या धोकादायक साथीची लागण टाळण्यासाठी अनेक गाईड लाइन देखील जारी केल्या आहेत. लोकांना वेळोवेळी हात स्वच्छ करण्यास सांगितले गेले आहे.
दरम्यान, आता वर्क फ्रॉम होमनंतर ऑफिसमध्ये जाऊन काम करण्यास सुरुवात केली असेल तर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घर ते ऑफिस असा प्रवास करताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी काही सोपे उपाय आज आम्ही सांगणार आहोत. जर तुम्ही हे उपाय अमलात आणले तर तुम्हाला याचा फायदा नक्की होईल.
घरातून बाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर मास्क लावणे आवश्यक आहे. तुम्ही आपला चेहरा फेस शील्डनं देखील झाकू शकता.
वेळोवेळी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. आणि आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत काम करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे.
ऑफिसमध्ये हँड सॅनिटाइझर, पेपर सोब आणि पाणी असणं आवश्यक आहे. तसेच दुपारचे जेवण, पाण्याची बाटली आणि आवश्यक औषधे स्वतःजवळ ठेवावी.
अन्य गरजेच्या वस्तू उदाहरणार्थ इअरफोन, चार्जर, पॉवर बँक आणि लॅपटॉप चार्जर इत्यादी गोष्टी देखील स्वतःजवळ आठवणीनं ठेवा.
तसेच, प्रवासादरम्यान कोणत्याही वस्तूंना हात लावणे टाळावे. पण स्पर्श करावा लागल्यास लगेचच सॅनिटाइझर वापरावे किंवा हात स्वच्छ धुऊन घ्यावे.