मुंबई – ऑटिझम (autism) या आजाराची मानसिक आणि शारीरिक अवस्था पाहात असताना आणि त्याची माहिती घेत असताना या जन्मस्थ अवस्थेचे काही विशिष्ट आणि महत्त्वाचे काही प्रकार आहेत. त्यांची माहिती इथे घेणे आवश्यक आहे.
अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनच्या डायग्नोस्टिक ऍन्ड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेन्टल डिसऑर्डर या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीत ऑटिझम(autism)चे चार प्रमुख प्रकार देण्यात आले आहेत. ऑटिस्टिक डिसऑर्डर, ऍस्पर्जर सिंड्रोम, चाईल्डहूड डिसइंटिग्रेटिव्ह डिसऑर्डर आणि परव्हॅसिव्ह डेव्हलपमेंट डिसऑर्डर अशा चार प्रमुख प्रकारात या मानसिक अवस्थेचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
1. ऑटिस्टिक डिसऑर्डर – यास ऑटिझम (autism)असेही म्हणतात. अगदी लहान मुलात आढळणारी ही अवस्था आहे. लहान वयातील पोरकटपणा, थोडक्यात हा प्रकार असणाऱ्या मुलांमध्ये मोठे झाल्यावरही पोरकट मनस्थितीचा पगडा दिसून येतो. वय वाढत असले तरी त्यांच्यातील ही पोरकटपणाची स्थिती कायम असते.
2. ऍस्पर्जर सिंड्रोम – हा ऑटिझम(autism)चा प्रकार म्हणजे मनाची विस्कळीत अवस्था होय. थोड्या मोठ्या वयात हा ऑटिझमचा प्रकार आढळून येतो. यास ऍस्पर्जर्स डिसऑर्डर असेही म्हंटले जाते.
3. चाईल्डहूड डिसइन्टिग्रेटिव्ह डिसऑर्डर – हा ऑटिझम (autism) प्रकार सीडीडी या नावानेही ओळखला जातो. या प्रकारात विशेषत: वेडी मुले किंवा मानसिक संतुलन बिघडलेली मुले यांचा समावेश होतो. यामध्ये विशेषत: अगदीच लहान म्हणजे वयाच्या तीन ते सहा वर्षे वयापर्यंतच्या मुलांचा समावेश होतो.
या वयोगटातील लहान मुलांच्या मनावर अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात या आजाराचा परिणाम झालेला असतो. या अवस्थेत शरीरापेक्षाही मनावर याचा प्रभाव अधिक प्रमाणात असतो.
4. पव्हॅसिव्ह डेव्हलेपमेंटल डिसऑर्डर – या प्रकाराला पीडीडी असेही म्हंटले जाते. या प्रकारच्या ऑटिझममध्ये कोणतीही विशिष्ट प्रकारची ठाम अशी लक्षणे सांगता येत नाहीत. अनिश्चित असा हा ऑटिझम (autism) प्रकार आहे. यामध्ये शारीरिक आणि मानसिक अवस्थेचे कसलेही विश्लेषण ठामपणे करता येणे अवघड आहे.
म्हणूनच याला ऍटिपिकल ऑटिझम (autism) असेही म्हणतात. म्हणजेच कोणत्याही विशिष्ट वर्गात न बसणारा आत्मकेंद्रीपणा. अशा पद्धतीने ऑटिझमच्या काही विशिष्ट महत्त्वाच्या प्रकारांवर संशोधन करण्यात आले आहे. या वर्गीकरणाद्वारे ऑटिझमचा अभ्यास करणे आणखी सोयीचे झाले आहे.