Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

एक जीबी इंटरनेटसाठी साडेतीन हजार रुपये? – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
July 27, 2022
in लाईफस्टाईल
A A
एक जीबी इंटरनेटसाठी साडेतीन हजार रुपये? – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

भारतात 4G आल्यापासून इंटरनेट डेटाच्या किमतीत कमालीची घट झाली आहे.  आता आपण 3G च्या तुलनेत अतिशय कमी खर्चात इंटरनेट डेटा वापरतो. पण तुम्हाला माहित आहे का की असाही एक देश आहे जिथे एक जीबी इंटरनेट डेटासाठी 3,500 रुपये मोजावे लागतात.  दक्षिण अटलांटिक महासागराच्या ब्रिटीश प्रदेशात सेंट हेलेना नावाचा देश आहे, येथे एक जीबी डेटाची किंमत सुमारे 41 डॉलर म्हणजेच जवळपास साडेतीन हजार रुपये आहे. तर याउलट इस्त्राईलमध्ये सर्वात कमी किंमत असून, येथे 1 GB इंटरनेट डेटाची किंमत फक्त 3 रुपये आहे !

नुकतीच 233 देशांमधील इंटरनेट डेटाच्या किमतींची तुलना करून वर्ल्ड वाइड मोबाइल डेटा प्राइसिंग 2022 ची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या यादीनुसार, सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा इस्रायलमध्ये आहे, तर सर्वात महाग डेटा सेंट हेलेनामध्ये आहे.

रिपोर्टनुसार, भारतात इंटरनेट डेटा खूपच स्वस्त आहे, त्यामुळे त्याची मागणीही जास्त आहे. स्वस्त डेटाच्या या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे, येथे आपल्याला 1 GB इंटरनेट डेटासाठी सुमारे 14 रुपये मोजावे लागतात. भारतापूर्वी, इस्रायल (अंदाजे रु.3), इटली (अंदाजे रु. 10), सॅन मारिनो (अंदाजे रु. 11) आणि फिजीमध्ये 1 GB इंटरनेट डेटाची किंमत रु. 12 आहे.  यानंतर भारताचा क्रमांक लागतो.

* ‘या’ देशांमध्ये इंटरनेट सर्वात महाग !

या यादीत पाकिस्तान 13 व्या क्रमांकावर आहे, येथे एक जीबी इंटरनेट डेटाची किंमत सुमारे 29 रुपये आहे.  यूएसमध्ये, डेटाची किंमत सूचीमध्ये सरासरी मानली गेली आहे, येथे एका GB साठी $ 4.98 डॉलर म्हणजेच सुमारे 400 रुपये द्यावे लागतील. सेंट हेलेना, फॉकलँड बेटे, सो टोमे आणि प्रिंसिपे, टोकेलाऊ आणि येमेनमध्ये इंटरनेट सर्वात महाग आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar