Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

एका कोशिंबिरी पासून बनवा चार पौष्टिक रेसिपी – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
April 7, 2022
in आरोग्य वार्ता
A A
एका कोशिंबिरी पासून बनवा चार पौष्टिक रेसिपी – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

कोशिंबीर हा भारतीयांच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक. मुख्यत: आपण टोमॅटोची कोशिंबीर करत असलो तरी अनेक प्रकारच्या कोशिंबिरी करता येतात. त्या चवदार तर असतातच, पण त्यात पोषकमूल्येही जास्त प्रमाणात असतात. पाहूया काही वेगळ्या कोशिंबिरी-

1) मूग-कोबी कोशिंबीर
साहित्य :
मोड आलेले मूग, कोबी चिरलेला, उकडलेला मोठा बटाटा, डाळिंबाचे दाणे, लिंबाचा रस दोन छोटे चमचे, कोथिंबीर छोटा चमचा, चवीप्रमाणे मीठ.
कृती :
एका मोठ्या भांड्यात सर्व साहित्य एकत्र करून मीठ, लिंबाचा रस घालून कालवा आणि खायला द्या.

2)पालकाची पचडी
साहित्य :
ताजा पालक बारीक चिरलेला, काकडी बारीक चिरलेली, लाल सुकलेली मिरची, दाण्याचा जाडसर कूट दोन छोटे चमचे, साखर एक छोटा चमचा, लिंबाचा रस अर्धा छोटा चमचा, तेल छोटा चमचा, फोडणीचे साहित्य.
कृती :
पालक, काकडी, दाण्याचा कूट, मीठ, लिंबाचा रस एकत्र करा. छोट्या कढईत तेल घालून मोहरी, हिंग, हळद व लाल मिरचीचे तुकडे घालून ती फोडणी वरील मिश्रणावर घाला आणि सगळे एकत्र करा. ही पचडी पोळी, थालीपीठ बरोबर चांगली लागते.
टीप :
करडईच्या पानांची पण याच पद्धतीने पचडी करता येते.

3)मोड आलेल्या मेथीची कोशिंबीर
साहित्य :
मोड आलेल्या मेथीची दाणे, सुके खोबरे, बारीक चिरलेला गूळ अर्धी वाटी, मीठ चवीप्रमाणे.
कृती :
मेथीचे दाणे भरपूर पाणी घालून भिजत ठेवा. ते वेळा ते पाणी बदला म्हणजे दाण्याचा वास येत नाही आणि गुळगुळीतपणा निघून जातो. पाण्यातून काढून ते दाणे मोड येण्यासाठी साधारण तसं ठेवा. मोड आल्यानंतर वरील सर्व साहित्य एकत्र करा आणि मिनिटे बाजूला ठेवा. त्यात गूळ चांगला मिसळल्यानंतर खायला द्या.
टीप :
मोड आलेली मेथी कडू लागत नाही. ही कोशिंबीर एका वेळेला जास्त जात नाही पण नियमित खाल्ल्यावर सवय होते.

4)गाजर-मूग कोशिंबीर
साहित्य :
मुगाची डाळ, किसलेले गाजर, कोथिंबीर एक मोठा चमचा, लिंबाचा रस छोटा चमचा, तेल छोटा चमचा, फोडणीचे साहित्य.
कृती :
मुगाची डाळ एक तास आधी पाण्यात भिजवून ठेवावी. डाळ फुगून आल्यावर ती स्वच्छ धुऊन निथळत ठेवा. डाळ, किसलेले गाजर, कोथिंबीर, लिंबाचा रस घालून कालवून घ्या. कढईत तेल घालून त्यात फोडणीचे साहित्य घाला आणि ही फोडणी कोशिंबिरीवर घालून हलवा.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar